सेवानिवृत्त शिक्षिका सौ संध्या गोपाळराव देशपांडे (वय ८१) यांचे अल्प आजाराने निधन .
पुणे : कोथरूड येथील माणेक अपार्टमेंट मधील ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्त शिक्षिका सौ संध्या गोपाळराव देशपांडे (वय ८१) यांचे नुकतेच अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती,दोन विवाहित मुली,दोन मुले,सूना,नातवंड आहेत.
परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथे त्या जिल्हा परिषदेच्या शाळेत अनेक वर्ष शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.अनेक विद्यार्थांना ज्ञानदानाचे व संस्कार घडविण्याचे काम त्यांनी केले.
कोथरूड भागात सामाजिक कार्याद्वारे अनेक परिवार त्यांनी जोडले.वैकुंठ मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636