मोहसीन खान प्रीमियर लीग क्रिकेट टूर्नामेंट फायनल मध्ये रिझवान कुरेशी फॅन क्लब विजेता व उपविजेता मोहसिन मूनलईट.
२३ -२७ डिसेंबर रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळ येथे क्रिकेट टूर्नामेंट उत्साहात संपन्न
पुणे न्यूज एक्सप्रेस :
औरंगाबद – मोहसीन खान प्रीमियर लीग क्रिकेट टूर्नामेंट उत्साहात संपन्न झाले. फायनल मध्ये रिझवान कुरेशी फॅन क्लब विजेता आणि उपविजेता मोहसिन मूनलाईट ठरले मोहसिन खान प्रीमियर लीग टूर्नामेंट खड़केश्वर मराठवाड़ सांस्कृतिक मंडळ येथे घेण्यात आले होते.
मोहसीन खान प्रीमियर लीगमध्ये 10 संघांनी भाग घेतला. 23 डिसेंबरपासून ही स्पर्धा सुरू झाली 27 डिसेंबरला अंतिम सामना अतिशय रोमांचक होता… त्याचे संपूर्ण श्रेय स्पर्धेचे आयोजक अल्ताफ शाह सर यांना जाते.ही स्पर्धा चांगल्या प्रकारे यशस्वी झालेली होती. टीम विजेता रिझवान कुरेशी फॅन क्लबला रोख पारितोषिक 15000 रुपये विजेता टीमला काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख युसूफ लीडर यांचा तर्फे देण्यात आले तर उपविजेता संघ मोहसीन मूनलाइट यांचे तर्फे रोख पारितोषिक 8000 रुपये वतीने देण्यात आले आहेत. आयोजक अल्ताफ शाह सर यांनी ही अतिशय यशस्वी स्पर्धा आयोजित केली.
२७ डिसेंबरला मोहसिन खान प्रीमियर लीग टूर्नामेंट फायनल मॅच झाले यात रिझवान कुरेशी फॅन क्लब तसेच मूनलाईट फायनल मॅच चा मुकाबला झाला या फायनल मुकाबल्यात रिझवान कुरेशी फॅन क्लब यांनी विजय मिळविला.विजय टीमला पंधरा हजार रुपये रोख तसेच ट्रॉफी औरंगाबाद शहर काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष मोईन इनामदार, इंजी,मोहसीन खान यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहेत.
यावेळी इंजिनियर मोहसीन खान,अमीर अब्दुल सलीम, जाहांगिर खान,विजय वाघोल,वाजिद पाशा, मोहसीन मून लाईट, इरफान पठाण,अल्ताफ शहा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
इंजिनीयर मोहसिन खान यांनी यावेळी सांगितले की युवकांनी जास्त जास्त खेळाकडे लक्ष द्यावे तसेच दररोज व्यायाम करावे,वॉकिंग करावे,तसेच फुटबॉल,हॉकी, क्रिकेट या खेळाकडे जास्त लक्ष द्यावे नशेच्या आहारी न पडता आपल्या फिटनेस कडे लक्ष द्यावे असे यावेळी सांगितले आहे.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636