ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेत संजय नार्वेकर परतला आहे कॉंट्रॅक्टर मुकेश जाधवच्या रूपात


पुणे न्यूज एक्सप्रेस :

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ या आधुनिक प्रेम कहाणीतील नाट्य आणखी तीव्र झाले आहे. अयान ग्रोव्हर म्हणजे AG (अभिषेक बजाज) चा वैताग स्पष्ट दिसतो आहे. त्याने शिवांगी (खुशी दुबे)चा अपमान करून तिला ताकीद दिली आहे की, त्याची गर्लफ्रेंड ईरा (क्रिसन बरेटो) विदेशातून परत येईपर्यंत तिने त्याच्या मार्गात येऊ नये. दुसरीकडे, आपल्या जीवनात गोंधळ माजवणारे एक वादळ आपल्याकडे घोंघावत येत असल्याबाबत शिवांगी अनभिज्ञ आहे.

धूर्त आणि निर्दयी मुकेश जाधव (संजय नार्वेकर) ला ‘संगम सिनेमा’ हे चित्रपटगृह येन केन प्रकारेण बळकावायचे आहे आणि त्यासाठी तो शिवांगी आणि तिच्या आईच्या शोधात आहे. जाधव दाढी करवून घेत असताना त्याचा एक अंगरक्षक धावतपळत येतो आणि खबर देतो की, त्यांना शिवांगीचा ठावठिकाणा लागला आहे. दचकलेल्या न्हाव्याच्या हातून जाधवला जराशी दुखापत होते. सोशल मीडियावर AG आणि शिवांगीचे छायाचित्र पाहून जाधव आपला मनसुबा व्यक्त करतो, “आता हजामत मी करणार” आणि असे बोलताना बिचाऱ्या न्हाव्याचा गळा कापतो.

Advertisement

LINK: https://www.instagram.com/p/C-IQWYtvuGy/?hl=en

या दृश्याबद्दल बोलताना कॉंट्रॅक्टर मुकेश जाधवची भूमिका करत असलेला संजय नार्वेकर म्हणतो, “एखादे धूर्त पात्र साकारण्यात जो एक आवेग असतो, तो मला आवडतो. आणि मी साकारत असलेल्या मुकेश जाधवमध्ये अनेक ग्रे छटा आहेत. त्याच्यासाठी अशक्य असे कोणतेच काम नाही. आणि कोणतीही किंमत देणे त्याला सहज शक्य आहे. त्यामुळेच तो एक निर्ढावलेला खलनायक आहे. आगामी भागांमध्ये त्याला शिवांगीचा ठावठिकाणा कळेल आणि तिच्याकडून संगम सिनेमाची कागदपत्रे मिळवण्यासाठी तो वाट्टेल ते करेल. कॉंट्रॅक्टर जाधवमुळे मालिकेच्या कथानकात नक्कीच भय आणि नाट्याचा एक नवीन थर जोडला जातो आणि त्याचा शिवांगी, तिची आई आणि सर्व संबंधितांच्या आयुष्यावर प्रभाव पडतो.”

बघत रहा, ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत. शिद्दत. मोहब्बत’ दर सोमवार ते शुक्रवार रात्री 8:00 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर.


pune news express

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page