संतोष आठवले आदर्श समाज भुषण पुरस्काराने सन्मानित
पुणे न्यूज एक्सप्रेस :
नवे दानवाड : नवे दानवाड गावचे सुपुत्र पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना राष्ट्रीय अध्यक्ष संतोष एस. आठवले यांना माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांच्या शुभ हस्ते राज्यस्तरीय आदर्श समाज भुषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले .
सध्या ते पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्षपदी कार्यरत आहेत भुमीहीन शेतमजुर शेतमालक व्हावा यासाठी गेली दहा वर्षे ते आंदोलन करत आहेत समाजातील अन्याय आत्याचार विरोधात ते नेहमीच पुढाकार घेऊन लढत असतात . दुध व दुग्धजन्य पदार्थांची भेसळ रोखण्यासाठी त्यांनी आंदोलन करून समाज्याचे आरोग्य चांगले राहवे यासाठी प्रयत्न केले आहेत तसेच इचलकरंजी यंत्रमाग कामगारांना मजुरी वाढीसाठी व यंत्रमाग कामगार महामंडळ स्थापन व्हावे यासाठी त्यांनी यंत्रमाग कामगारांना घेवून आझाद मैदानावर उपोषणाला बसले होते . या विविध प्रश्ना संदर्भात त्यांनी लोक लढा उभारल्याची दखल सहारा फौंडेशनने घेऊन त्यांना राज्यस्तरीय आदर्श समाज भूषण पुरस्कार व शाल फेटा मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले . समाजाच्या समृद्धीसाठी एक उदात्त आणि ध्येयवादी वृत्तीने अखंड कार्यरत राहून आपल्या ओजस्वी स्वरूपाच्या कार्यातून समाज जीवनाचा चेहरा मोहरा बदलणारी माणसे हीच खरी अक्षय संपत्ती असते .
दै सहारा दपर्ण , सहारा रेस्क्यु फोर्स यांच्या संयुक्त विद्यमाने व सहारा फौडेशन चौदाव्या वर्धापन दिना निमित्त राज्यस्तरीय पुरस्कार 2024 वितरण सोहळ्याचे आयोजन शिवनंदी मंगल कार्यालय कबनुर येथे करण्यात आले होते अध्यक्षस्थानी महाराष्ट्र गोवा राज्य बार कौन्सिल चे अध्यक्ष विवेक घाटगे होते .संतोष आठवले 1997 पासून पत्रकारीता सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत ते साप्ताहिक धर्मनिरपेक्ष , साप्ताहिक बुद्धभुषण , दैनिक राष्ट्रदर्पण या वृत्त पत्राचे संपादक व संघर्षनायक मीडिया’ निर्धार पोलिस टाईम्स , भष्ट्राचार निवारण डिजीटल न्युज नेटवर्क या डिजीटल मीडियाचे संपादक म्हणून कार्यरत आहेत तर रिपाई गवई शिरोळ तालुका अध्यक्ष , स्वाभिमानी रिपब्लीकन पार्टी कोल्हापुर जिल्हा अध्यक्ष , आजाद समाज पार्टी भिम आर्मी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष , जनता संघर्ष दल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणुन त्यांनी कार्य केले आहे .
आपल्या समाज जीवनाच्या कार्याचा परिघ विस्तारून समाजातील प्रत्येक घटकाला आपल्या कवेत घेऊन त्याचा विकास करण्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये आहे .सामाजिक आर्थिक राजकीय कला क्रीडा शैक्षणिक वैद्यकीय अशा अनेक क्षेत्रातील आपले असामान्य कर्तृत्व सिद्ध करणारे आपण समाज रत्न ठरत आहात . त्यामुळेच सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करून समाजापुढे आदर्श निर्माण करणाऱ्या आपल्यातील कृतिशील व्यक्तिमत्त्वाला हे मानपत्र प्रदान करताना आम्हाला आनंद होत आहे .आपण केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन सहारा फाउंडेशन 2024 चा आदर्श समाज भूषण हा राज्यस्तरीय पुरस्कार आपणास प्रदान करण्यात येत आहे या पुरस्कारातून आपणास प्रेरणा मिळो आरोग्यदायी उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा ! आशा आशयाचे मानपत्र देण्यात आले आहे
यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गायकवाड ‘ इचलकरंजी शहर भाजपा अध्यक्ष पै अमृत मामा भोसले ,पंचगंगा सह साखर कारखाना संचालक प्रमोद पाटील , माजी सभापती सौ. रेश्मा पापालाल सनदी ,कबनूर गावच्या विद्यमान सरपंच सौ. शोभा शंकर पवार , सौ वैशाली कदम सहारा फौडेशन चे संस्थापक पापालाल सनदी , प्रदेश अध्यक्ष परवेझ सनदी , महेश कांबळे , उमेश जाधव , सुरेश कुंभार (पत्रकार ) विजय देसाई , महेश शिऊडकर , सचिन सुतार जैद भोकरे , युसुफ मकानदार , सचिन कांबळे महेश पाटील आदीच्या सह सहारा फौडेशन चे बहुसंख्य कार्यकर्ते हितचितंक उपस्थित होते
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636