शौनक अभिषेकी यांचा सत्कार
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे: श्री गुरुदेव दत्त सांस्कृतिक मंडळतर्फे ज्येष्ठ शास्त्रीय गायक शौनक अभिषेकी यांचा सत्कार करण्यात आला. कमला नेहरू पार्क जवळील श्री गुरुदेव दत्त सांस्कृतिक मंडळ आयोजित सांस्कृतिक महोत्सवात मंडळाचे अध्यक्ष अप्पा खिलारे, सचिव नागेश करपे, अजित सांगळे, सप्रे गुरुजी तसेच शिरीष बोधनी यांनी हा सत्कार केला.
याच महोत्सवात पं.जितेंद्र अभिषेकी यांनी सादर केलेल्या गायनाचे छायाचित्र त्यांना भेट देण्यात आले. हा कार्यक्रम दत्त जयंती निमित्त रविवारी,२४ डिसेंबर रोजी सायंकाळी झाला.
१९८४ मध्ये या महोत्सवाची सुरुवातच जितेंद्र अभिषेकी यांच्या गायनाने झाली होती. त्या क्षणाचे दुर्मिळ छायाचित्र शौनक अभिषेकी यांना भेट देण्यात आले. त्यांना त्यावेळी साथसंगत करणारे मेघन श्रीखंडे हेही उपस्थित होते. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश संजय यादव, स्वप्नील रास्ते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.स्वराभिषेक हा भाव संगीत, नाट्य संगीता वर आधारित कार्यक्रम शौनक अभिषेकी यांनी सादर केला. रसिकांनी भरभरून दाद दिली.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636