पैशाचा पाऊस पाहून जलपर्णी गेली वाहून – शिवसेना पुणे 


Seeing the rain of money, the waterfowl drifted away – Shiv Sena Pune 

पुणे न्यूज एक्सप्रेस :

शिवसेना पुणे शहराच्या वतीने शहरप्रमुख संजय मोरे यांनी आज पुणे महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात तसेच सत्ताधारी आमदार सिद्धार्थ शिरो॓ळे यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी आज मा पोलिस आयुक्त पुणे यांस पत्र दिले आहे .

पुणे महानगरपालिकेत काम न करता बिले काढली जातात, हे आता सत्ताधारी पक्षातले आमदारच बोलल्याने भ्रष्टाचार होत असल्याची एक प्रकारे कबुली देत आहेत. काल आमदार सिद्धार्थ शिरो॓ळे यांनी पत्रकार परिषदेत जलपर्णी न काढता व बिल अदा करण्याबाबत सदर मुद्दा मांडला आहे. याचा अर्थ 2017 पासून पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्ष सत्तेत असताना कामे न करता बिले काढण्याचा उद्योग फार मोठ्या प्रमाणात चालू होता. या आमदार महोदयांना हे सर्व माहिती होत तर मग त्यांना हे काय आत्ताच कळलं का ? इतके दिवस का गप्प होते ? कोणाचीच दबाव होता ? अशाप्रकारे खोटी बिले काढली जातात हे काय फक्त आजच नाही झाले. ते स्वतः पण 2017 पासून नगरसेवक होते. त्यांना सर्व माहिती असणार हे सर्व लोक यात सामील आहेत. आत्ता यांची कामं झाली नसतील म्हणून तसेच निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काम केल्याचा आव आणण्यासाठी आरडा ओरड सुरू झालेला आहे. नाहीतर गेली पाच सात वर्ष सत्ताधाऱ्यांकडून बिन बोभाट हे सर्व प्रकार सुरू आहेत.

Advertisement

सर्वसामान्य नागरिकांच्या कररूपी जमा झालेल्या पैशातून खिसे भरायचं काम चालू आहे. आधी सामील व्हायचे आणि नंतर ओरडायचे ही सत्ताधारी पक्षाची खेळी सामान्य जनतेला कळून चुकली आहे. जलपर्णी न काढताच पुणे महानगरपालिके कडून काढलेली बिले या सत्ताधारी आमदारांच्या वक्तव्याला गांभीर्याने घेऊन सदर प्रकरणात गुन्हे शाखा युनिट 1, सीबीआय आणि ईडी मार्फत चौकशी झाली पाहिजे. महाराष्ट्र शासनाने व केंद्र सरकारने पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची, ठेकेदारांची, आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधींची गुन्हे शाखा युनिट – 1,अँटी करप्शन, सीबीआय व ईडी मार्फत चौकशी करावी. सर्वसामान्य नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करणाऱ्या सत्ताधारी भ्रष्टाचार्यांच्या विरोधात या विषयावर कारवाईसाठी शिवसेनेच्या वतीने वारंवार आवाज उठवण्यात आला पण सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले असे संजय मोरे म्हणाले .

या तक्रारीची ऐक प्रत मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य , अॅण्टी करप्शन ब्युरो पुणे, आणि पीएमओ, दिल्ली यांस पाठविण्यात आली आहे .

अनंत रामचंद्र घरत

प्रसिद्धी प्रमुख शिवसेना पुणे .


pune news express

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page