राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या चार विद्यार्थ्यांची निवड
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी : भरत शिंदे
अतिग्रे – संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल सी ए आय इ (केम्ब्रिज) विभागातील चार विद्यार्थ्यांची शालेय राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी नुकतीच निवड झाली. एल एक्स टी स्केटिंग राईन, पुणे आयोजित राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेमध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यानी यश संपादन केले.
ते पुढील प्रमाणे …….
1) अमित राजाराम चमकेरी (इ 5 वी) – 2 सुवर्णपदक 2) शौर्य सुनील कांगले (इ 6 वी) – 2 रौप्य पदक 3) आहान सिद्धेश जैन ( इ 8 वी) – 2 कांस्य व 1 रौप्य 4) शौर्य धैर्यशील भोसले (इ 9 वी )- 2 सुवर्णपदक प्राप्त केले. झारखंड, रांची येथे होत असणाऱ्या शालेय राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. संस्थापक श्री संजय घोडावत, विश्वस्त श्री विनायक भोसले, संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांना प्रशिक्षक श्री मंगेश जाधव व श्री. शुभम पाटील तसेच क्रीडा विभाग प्रमुख श्री विठ्ठल केंचनावर यांचे मार्गदर्शन लाभले.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636