स्व. आमदार डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील स्मृती अखिल भारतीय मराठी कथा स्पर्धेचा निकाल जाहीर
पुणे न्यूज एक्सप्रेस :
शिरोळ/प्रतिनिधी-
स्वर्गीय आमदार डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील स्मृती अखिल भारतीय कथा स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. भारती देव (नाशिक) यांच्या मातृत्व आणि संतोष नारायण पाटील (आजरा) यांच्या देव माशाची शेवटची उडी या कथांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला आहे. अशी माहिती इंद्रधनुष्य मासिकाचे कार्यकारी संपादक संजय सुतार व साहित्य सहयोग दिपावलीचे संपादक सुनील इनामदार यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
ते म्हणाले, हे स्पर्धेचे नववे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही स्पर्धेला लेखकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. मुंबई, नवी मुंबई सह महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि कर्नाटक, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यातून 138 कथाकारांनी 147 कथा स्पर्धेसाठी पाठविल्या होत्या. मराठी कथा स्पर्धेला एवढा अभूतपूर्व प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व स्पर्धकांचे आम्ही आभार मानत आहोत. एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या दर्जेदार कथांना न्याय मिळावा व जास्तीत जास्त नवोदितांना प्रोत्साहन मिळावे यासाठी मासिक इंद्रधनुष्य व साहित्य सहयोग दीपावली अंक यांच्यावतीने बक्षिसांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .
प्रथम तीन क्रमांकाच्या बक्षिसाबरोबरच आता तीन विशेष उल्लेखनीय कथांना प्रत्येकी पाचशे रुपयांचे पारितोषिक, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र दिले जाणार आहे. तसेच उत्तेजनार्थ तीन कथांचे बरोबरच तीन स्थानिक कथाकरांना उत्तेजनार्थ तीनशे रुपये बक्षीस स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र दिले जाणार आहे. बक्षिसांच्या नवीन रचनेनुसार स्पर्धा परिक्षकांनी पुढील प्रमाणे निर्णय जाहीर केला असून बक्षिसाचे वितरण लवकरच मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
द्वितीय क्रमांक विभागून – 1) इतुसा चांद – उदय गणपत जाधव (मुंबई), 2) कौतिक- मुकेश आयाचित (पुणे),
तृतीय क्रमांक विभागून -1) भीतीची व्याख्या – विनय खंडागळे (बुलढाणा), 2) दिवटा – भास्कर बंगाळे (पंढरपूर)
विशेष उल्लेखनीय कथा- 1) एका अबोल्याचे महाभारत- नंदकुमार वडेर (सांगली), 2) एक बाकी एकाकी – रश्मी मदनकर (नागपूर), 3) सत्कार – विजयराज कोळी (शिरोळ ),
उत्तेजनार्थ – 1) जत्रा – सचिन मणेरीकर (फोंडा -गोवा), 2) वधु परीक्षा – शीतल पाटील (बेळगाव), 3) सोनचाफा- नवी चाहूल- स्वाती सारंग पाटील (नाशिक)
उत्तेजनार्थ स्थानिक – 1) फडकऱ्याची पोर – वंदना जाधव (पन्हाळा), 2) अखेर तिने करून दाखविले – माणिक नागावे (कुरुंदवाड), 3) इंदुबाई टू संदीप व्हाया व्यंकाप्पा – सिकंदर गुलाब नदाफ (इचलकरंजी)
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636