रुकडीतील मराठा आरक्षणाच्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणास शिवसेना उपजिल्हाप्रमुख अविनाश बनगे यांचा जाहीर पाठिंबा
कोल्हापूर विशेष प्रतिनिधी : संभाजी चौगुले :
रुकडी (तालुका हातकणंगले) येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देणे साठी सकल मराठा समाज रुकडी यांचे एक दिवसाचे लाक्षणीय उपोषण अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सुरू असलेल्या आंदोलनास चोकाक येथील डॉक्टर अविनाश बनगे शिव सेना उपजिल्हा प्रमुख- कोल्हापूर जिल्हा, व माजी सभापती- पंचायत समिती, हातकणंगले, यांचेकडून तसेच मराठा आरक्षणाबाबत मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे या आरक्षणाबाबत मार्ग काढत आहेत त्यांनाही या आरक्षणात यश येवो ही श्री तुळजाभवानी चरणी प्रार्थना आहे
अशा आशयाचे निवेदन देऊन रूकडी येथील सकल मराठा समाजाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी सोमवारी 30 /10/ 2023 रोजी सकाळी उपोषण स्थळी भेट देऊन लाक्षणिक उपोषणास व आरक्षणाच्या योग्य मागणीसाठी पाठिंबा दर्शविला.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636