पुरग्रस्तांच्या मदतीला पुन्हा धावला श्री. गुरुदत्तखाना पूरग्रस्तांसाठी उभी केली छावणी…
पुणे न्यूज एक्सप्रेस :
अकिवाट / रमेशकुमार मिठारे
काही दिवसांपासून शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. शिरोळ तालुक्यातील सर्व पूरग्रस्त लोकांना आणि जनावरांना आधार देण्यासाठी आजपासून म्हणजे शनिवार दिनांक २७ जुलै २०२४ पासून गुरुदत्त शुगर्स यांच्या वतीने कारखास्थळावर पूरग्रस्त लोकांसाठी पूरग्रस्त छावणी उभी केली असल्याची माहिती गुरुदत्त चेअरमन माधववराव घाटगे यांनी दिली.
जुलै महिन्यात पुन्हा एकदा आपण या महापुराच्या विळख्यात सापडलो असताना परत एकदा मदतीचा हात म्हणून शेतकऱ्यांची, जनतेची आणि मुक्या जनावरांची होणारी बिकट अवस्था पाहून जनावरांची छावणी तसेच लोकांना निवाऱ्याची सोय करण्याचा निर्णय श्री. गुरुदत्त कारखान्याचे चेअरमन श्री. माधवराव घाटगे साहेब तसेच एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री राहुल दादा घाटगे यांनी घेतला आहे. कारखान्यावर निवाऱ्याची व्यवस्था तसेच जनावरांची छावणीची सोय करण्यात आली आहे. शिरोळ तालुक्यात २००५, २०१९, व २०२१ यासाठी आलेल्या महापुरात गुरुदत्त शुगर्सने मोलाची मदत केली आहे.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636