दत्तवाड येथे रंगणार स्मार्ट सौभाग्यवती होम मिनिस्टर व हळदी कुंकू चा कार्यक्रम
पुणे न्यूज एक्सप्रेस :
दत्तवाड :- जंहाॅंगीर रणमली
राजमाता जिजाऊ जयंती निमित्त रविवार दिनांक 12 रोजी येथील दत्तवाड महिला मंच यांच्यामार्फत गांधी चौक सरकार वाडा येथे स्मार्ट सौभाग्यवती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून याचे उद्घाटन त्रिशला संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते होणार असून यावेळी आमदार शशिकला जोल्ले, श्रीमंत सरकार सौ दर्शनादेवी करणसिंग घोरपडे, श्रीमंत सरकार सौ गायत्री देवी भवनसिंग घोरपडे, स्वप्नाली हुक्केरी ,मिनाज जमादार, श्रद्धा खोत प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.
सदर स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस 11000 ची पैठणी व सोन्याची नथ, द्वितीय बक्षीस टीव्ही, तृतीय बक्षीस शेगडी, चौथे बक्षीस मोबाईल ,पाच ते बारा नंबर साठी साडी ,तेरा ते 16 नंबर साठी डिनर सेट, 17 नंबर साठी कुकर व उपस्थित सर्व महिलांना भेटवस्तू देण्यात येणार आहे.
यावेळी मुलींसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात आला असून यात लहान गट व मोठ्या गटांना बक्षीस देण्यात येणार आहेत. तरी सर्व महिलांनी सहभागी घ्यावे असे आव्हान करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजक आहेत-सौ.सगीता झुणके,सौ कांचन चौगुले,सौ मनिषा जोशी,सौ दिपाली पाटील,कु सगिता विभुते,सौ जरिनाबी मुल्ला,सौ मंगल मोहिते,सौ भारती आडे,सौ,महादेवी खोत,सौ प्रगती घोरपडे
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636