सामाजिक सलोखा आरक्षण परिषद
पुणे न्यूज एक्सप्रेस :
सध्या राज्यात आरक्षण प्रश्नाने गंभीर वळण घेतले आहे. प्रत्येक समाज आरक्षण मागत आहे. जाती जातीत दुरावा निर्माण होत आहे. शिव, शाहू, फुले, आंबेडकर, अण्णा भाऊंचा महाराष्ट्र वेगळ्या मार्गाने जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. सर्व समाजास न्याय मिळावा, कुणावरही अन्याय होऊ नये, सर्वांच्या मागण्या , अडचणी समजून घ्याव्यात, सर्व जाती, धर्मामधे ऐक्य, सलोखा निर्माण व्हावा यासाठी सामाजिक सलोखा आरक्षण परिषदचे आयोजन रविवार दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी स्थळ आचार्य अत्रे रंगमंदिर वाय सी एम हॉस्पिटल पिंपरी चिंचवड या ठिकाणी सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आले आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व संविधान प्रेमी संघटनांचे पदाधिकारी, सर्व पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, यांना नम्र विनंती आहे की कार्यक्रम मध्ये उपस्थित राहून सर्व समाज बांधवांचे आरक्षणाचे प्रश्न समजून घ्यावा. व सर्वांनी उपस्थिती रहावे असे आव्हान करण्यात आले आहे.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636