तिच्यातील ‘ती’ ला फुलविण्यासाठी समाजाचे योगदान महत्त्वाचे : अनुप जत्राटकर
समता जीवन गौरव पुरस्कार देऊन कॉ. सुमन पुजारी आणि उमेश गाड सन्मानित
पुणे न्यूज एक्सप्रेस :
कोल्हापूर : समाजातील ती आणि तो एकच असतात. त्याला मात्र समाज सहज फुलवतो. तिला मात्र फुलत असताना उपेक्षित ठेवतो. ती सतत धडपडते, बरच काही सहन करते, त्यातुनही ती जीवघेणा संघर्ष करते आणि तिला विकसित व्हायला अडथळा ठरणाऱ्या समाजाला स्वतः उभं राहून एक पर्यायी उत्तर देते. ती मोठी होत असताना तिच्यातील ‘ती’ ला फुलवण्यासाठी समाजाने सजग होऊन योगदान देणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन लेखक व दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांनी केले.
ते लढणाऱ्या मुलीचं भावविश्व उलगडणाऱ्या “तिला फुलू द्या!” या बहुचर्चित मराठी लघुपटाच्या पहिला प्रीमियर शो प्रसंगी राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी बोलत होते.
लघुपटाची संकल्पना धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टची तर निर्मिती निर्मिती फिल्म क्लबने केली आहे. दिग्दर्शक अनिल म्हमाने, निर्मात्या डॉ. शोभा चाळके, सह निर्माता विश्वासराव तरटे, सिकंदर तामगाव, क्रियेटिव्ह हेड ॲड. करुणा विमल, सह दिग्दर्शन अंतिमा कोल्हापूरकर, अर्हंत मिणचेकर यांचे, डी.ओ.पी. म्हणून अश्वजीत तरटे यांनी तर अंतिमा कोल्हापूरकर, आदित्य म्हमाने, दीक्षा तरटे, निखिल सोनुल, नमिता धनवडे, तक्ष उराडे, लक्ष्मी पासवान, सरिता कांबळे या कलाकारांनी लघुपटात मुख्य भूमिका केल्या आहेत.
यावेळी अनिल म्हमाने, प्रा. किसनराव कुराडे, कॉ. सुमन पुजारी, उमेश गाड, भरत रसाळे, सुरेश केसरकर, डॉ. शोभा चाळके, ॲड. करुणा विमल यांची भाषणे झाली.
तत्पूर्वी तिला फुलू द्या! लघुपटाच्या पहिल्या प्रीमियर शोचे क्लॅप मारुन अनुप जत्राटकर आणि मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी निर्मिती विचारमंच आणि संविधान जनजागृती अभियानाचा या वर्षीचा “समता जीवन गौरव” पुरस्कार देऊन सांगलीच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व कामगार नेत्या कॉ. सुमन पुजारी आणि गोव्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, नेते उमेश गाड यांचा तर, आम्ही भारतीय महिला मंचच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत तिला फुलवण्यासाठी सतत प्रयत्न करणाऱ्या डॉ. शोभा चाळके, ॲड. शितल देसाई, अनिता काळे, प्रभावती गायकवाड, निर्मला शिर्के, सरिता तरटे, प्रज्ञा कांबळे, कमल ठाणेकर, शैलजा शिंदे, षण्मुखा अर्दाळकर, आशा रावण, ज्योत्स्ना सावंत, वंदना दीक्षित, सुजाता कांबळे, प्रा. प्रतिभा पैलवान, क्रांती कांबळे, उषा कोल्हे, सरिता कांबळे, कमल कवठेकर, हिराताई देशमुख, सविता हुपरीकर, सरिता माने, धनश्री नाझरे, पूनम शास्त्री, उषा गवंडी, ॲड. तमन्ना मुल्ला, संगीता चौगुले, सारिका बेलेकर, गीता कांबळे, अक्काताई कांबळे, अस्मिता घोलप, ॲड. सुबोधिनी चव्हाण, आशा केसरकर, कुसूम राजमाने, वंदना साळुंखे, विजया कांबळे, माया तामगावे, उषा गोंजारी, अनिता बावडेकर, छाया माने, राजश्री मधाळे, रेखाताई कांबळे, लताताई नागावकर, रोहिणी भोसले, सुनिता खिल्लारे, ज्योती डोंगरे, मंगल समुद्रे, अस्मिता येरुडकर, शुक्राली सावंत, अॅड. वनिता भोरे, नूतन हातकणंगलेकर, दिपमाला कांबळे, सारिका कांबळे, वैशाली गवळी, राणी कांबळे, मनिषा डोणे, प्रा. अनुजा कांबळे, वृषाली कवठेकर, डॉ. सुजाता नामे, अनिता गायकवाड, प्रणोती लोंढे, नीती उराडे, विमल पोखरणीकर, शैलजा साबळे, लक्ष्मी कांबळे, पद्मा कांबळे, अॅड. प्रिती पवार, लता पुजारी, बिदावती पासवान, शर्वरी पाटोळे यांच्यासह इतर शंभर निवडक महिलांचा त्यांच्या सहकुटुंब व मित्र परिवारासह विशेष सत्कार करण्यात येणार आला. स्वागत सनी गोंधळी, प्रास्ताविक ॲड. करुणा विमल, सूत्रसंचालन स्वप्निल गोरंबेकर तर आभार अर्हंत मिणचेकर यांनी मानले.
——-
फोटो
तिला फुलू द्या! लघुपटाच्या पहिल्या प्रीमियर शोचे क्लॅप मारुन उद्घाटन करताना, अनुप जत्राटकर आणि मान्यवर.
—–
फोटो
समता जीवन गौरव पुरस्कार देऊन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कॉ. सुमन पुजारी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेश गाड यांचा सत्कार करताना डावीकडून अशोक माळवी, डॉ. शोभा चाळके, प्रा. किसनराव कुराडे, ॲड. करुणा विमल, सुरेश केसरकर, अंतिमा कोल्हापूरकर, अमोल सावंत आदी.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636