श्री पंचगंगा वरदविनायक मंदिर परिसर हजारो दिपकांनी उजळला
पुणे न्यूज एक्सप्रेस
इचलकरंजी, ता.७ : श्री 108 कुंडीय गणपती महायज्ञच्या सातव्या दिवशी मंदिर दिव्यांनी उजळले. श्री पंचगंगा वरदविनायक मंदिर परिसर, यज्ञशाळा तसेच नदीघाटावर हजारो दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला.वरद विनायक मंदिर प्रमुख अशोक स्वामी यांच्यासह गोविंद बजाज बाळासाहेब जांभळे द्वारकाधीश सारडा, हरीष सारडा,श्याम काबरा, गोविंद सोनी या मान्यवराच्या हस्ते दिपप्रज्वलन करून दीपोत्सवला सुरूवात केली
हा नयनरम्य सोहळा आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी भाविकांनी वरदविनायक मंदिर परिसरात गर्दी केली होती.
नदी संवर्धनाचा संदेश देत दीपोत्सव साजरा करण्यात आला आहे.माहेश्वरी महिला मंडळ, राधाकृष्ण महिला मंडळाने दीपोत्सवाचे आयोजन केले होते.आज सकाळी पूज्य जगद्गुरू पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी (सि. संस्थान मठ निडसोशी) यांनी भेट दिली. भक्ती ज्ञानाचे महत्त्व सांगण्यासाठी गणपती महायज्ञ सोहळा समाजाला ऊर्जा देणारा आहे. भक्तीचा हा अखंड महिमा समस्त जलकल्याण, विश्वशांती व पर्यावरण शुद्धतेसाठी महासंगम असल्याचे श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांनी सांगितले. शहर व जिल्हाभरासह कर्नाटक राज्यातील विविध आध्यात्मिक कार्याचा प्रचार, प्रसार करणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींनी भेट दिली.
आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने यज्ञशाळा भाविक भक्तांनी फुलून गेली. नियमित 108 कुंडांवर आज अनेकांनी सहकुटुंब धार्मिक, वैद्यिक पद्धतीने हवन केले. तसेच यज्ञशाळेत परिक्रमासाठी दिवसभर नागरिकांनी भाविकांची गर्दी होती. त्यासाठी श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती व श्री पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळाच्या वतीने भाविकांची खास सोय करण्यात आली होती.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636