इंडियन आयडॉल चित्रीकरणाच्या पहिल्या दिवसांपासून सुरू
पुणे न्यूज एक्सप्रेस :
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा प्रशंसित गायन रिॲलिटी शो, इंडियन आयडॉल, त्याच्या चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी नवीन परीक्षक म्हणून लाभलेल्या बादशाहच्या आगमनासह थेट सुरू झाला. बादशाह हात रुणांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. त्यामुळे त्याची उपस्थिती सेटवर सर्वांनाच खूप आवडून गेली. यामुळे प्रेक्षकांना खूप मज्जा आली. बादशाह परीक्षक असल्याने स्पर्धकांसह प्रेक्षकांना एक वेगळाच आनंद मिळणार आहे.
या सिझनमध्ये सर्व सीमारेषा तोडून अनेक नवीन मानके प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आहे. बादशाहच्या शब्दांत सांगायचे झाल्यास “सीन बनेगा टगडे वाला, लेवल वर अबकी बार.” उदयोन्मुख प्रतिभेच्या नाडीवर बोट ठेवून, बादशाह स्पर्धकांमधील उत्साही कामगिरी आणि अस्सल भावनांच्या शोधात असणार आहेलाईव्ह कार्यक्रमादरम्यान विस्तीर्ण अशा जुन्या काल मील मध्ये ऑडिशन करण्यासाठी एक नवीन असा लुक देऊन सेट तयार करण्यात आला आहे. हा सेट हुबेहूब नवीन सेट सारखाच दिसतो. स्पर्धे मध्ये सहभागी होण्यासाठी आलेले स्पर्धक हे मोठे स्वप्न घेऊन येत असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी हा सेटभावनिक विषय असतो.इंडियन आयडॉल लवकरच येत आहे, फक्त सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636