गोरगरीब विद्यार्थ्यांना विनाअनुदानित शाळेमध्ये RTE मधून शिक्षण राज्य सरकारने दिलेच पाहिजे ..फिरोज मुल्ला(सर)
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे.. शिक्षण हक्क समीती व विविध पक्ष संघटनेच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक ते शिक्षण आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य पुणे येथे भव्य इशारा मोर्चा काढण्यात आला
गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा अधिकार RTE च्या माध्यमातून विनाअनुदानित शाळेमध्ये मिळणारे हक्काचे व दर्जेदार शिक्षणाचा संविधानीक अधिकार रद्द करून श्रीमंत आणि गरीब यांच्यामध्ये एक मोठी दरी निर्माण केली आहे आणि विनाअनुदानित शाळा ह्या सर्व धनदांडग्याच्या आहेत सत्ते मध्ये आसणाऱ्या मंत्र्यासंत्र्यांच्या आहेत आणि त्यांनाच डोनेशन भरपूर प्रमाणात मिळवून देऊन आर्थिक फायदा करून द्यायचा कटकारस्थान शासन करत आहे असी शंका वाटत आहे
सरकारी शाळांची अवस्था कीती बिकट झाली आहे तीथे दर्जेदार शिक्षण गोरगरीब विद्यार्थ्यांना मिळत नाही आणि RTE मधून विनाअनुदानित शाळेमध्ये मिळणारे शिक्षण रद्द करून देशाच्या भावी पिढीवर अन्याय केला आहे लोकशाहीला समानतेला शिक्षण हक्क कायद्याला खूप मोठा धोका आहे
विनाअनुदानित शाळेमध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांना RTE अंतर्गत मिळणाऱ्या शिक्षणचा मुलभूत अधिकार जो मिळत होता तो नाकारण्यात आला हुकूमशाही पद्धतीने राज्य सरकारने जी.आर.काढून रद्द केला तो ताबडतोब मागे घ्यावा असी मागणी करत पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला(सर) यांनी जाहीर पाठिंबा दिला
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636