काळे झेंडे दाखवण्याचे आंदोलन स्थगित करा,नाहीतर जेलमध्ये बसा ,पोलिसांनी दिला इशारा.__राज्य प्रवक्ते संतोष
पुणे न्यूज एक्सप्रेस :
सांगली : उद्या दिनांक 17 रोजी आरएसएस सरसंघचालक माननीय मोहन भागवत यांचा सांगली दौरा आहे.या दौऱ्याच्या औचित्य साधून मराठा स्वराज्य संघाच्या वतीने राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली यांनी आरएसएसचे सरसंघचालक माननीय मोहन भागवत यांना सांगली मध्ये रस्त्यावर ठीक ठिकाणी काळे झेंडे दाखवण्याचे इशारा दिल होता.
ही बातमी काही वृत्तवाहिनी व वृत्तपत्रिके मध्ये मीडियाच्या माध्यमातून दाखवल्या गेल्या त्यामुळे सांगली शहरातील व जिल्ह्यातील सर्व पोलीस यंत्रणाला जाग आली. पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी, एलसीबीचे अधिकारी, विश्रामबाग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, सांगली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व इतर गुप्त खात्यातील सर्वांनी मिळून मला बोलवून माझ्याशी चर्चा करून आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली.सांगली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय देशमुख साहेब यांच्याशी चर्चा करून त्यांनी मला आंदोलन करू नका असे सांगितले .
यावर मी त्यांना सांगितले की भारत देश स्वातंत्र्य झाल्यापासून प्रत्येक नागरिकाला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे त्यामुळे तो बोलू शकतो आणि लोकशाहीच्या सनदशिर मार्गाने आंदोलन करू शकतो त्यामुळे मी लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने सरसंघचालक माननीय मोहन भागवत यांच्या जाणाऱ्या ताफ पुढे काळे झेंडे दाखवणार यावर मी ठाम राहिलो.यावर त्यांनी तुम्हाला आंदोलन स्थगित करावे लागेल,नाहीतर जेलमध्ये बसायला लागेल असा इशारा एलसीबीचे अधिकारीने दिला,
तसेच तुम्हाला दोन दिवस वडापाव खात बसावे लागेल असाही इशारा दिला यावर माझी भूमिका बदलणार नाही असे ठाम पणाने सांगितले, तरी त्यांनी मला खूप विनंती केल्या यावर मी आमच्या संघटनेचे अध्यक्ष मा.महादेव बापू यांच्याशी चर्चा करून मी निर्णय घेतो म्हणून सांगितले यावर मी संघटनेचे राज्याध्यक्ष माननीय महादेव बापू यांच्या बरोबर चर्चा केली त्यांनी मला आंदोलन स्थगित करण्यास सांगितले म्हणून मी हे आंदोलन स्थगित करत आहे.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636