बालाजी इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी गुगल मध्ये सिलेक्ट
पुणे न्यूज एक्सप्रेस :
शिरोळ तालुका : अर्जुन धुमाळे
बालाजी इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी गुगल मध्ये सिलेक्ट श्री बालाजी इंग्लिश मीडियम स्कूलचा माजी विद्यार्थी अवधूत मारुती जाधव सध्या आय. आय.टी जोधपुर येथे तिसऱ्या वर्षात शिकत असून त्याची निवड गुगल इंडिया मध्ये झाली आहे याबद्दल त्याचे अभिनंदन व सत्कार श्री बालाजी इंग्लिश मेडीयम स्कूलचे चेअरमन माननीय श्री मदनरावजी कारंडे साहेब यांनी केले तसेच त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .
प्रशालेचे प्रिन्सिपल माननीय श्री दत्तात्रय मिटके सर यांनी अवधूतचे यश म्हणजे आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट असून प्रचंड जिद्द, बुद्धिमत्ता व कठोर मेहनतीचे हे यश आहे असे म्हटले व त्यांला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनीही त्याचे कौतुक केले. अवधूतच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे .
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636