रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी अतिग्रे येथील भूसंपादन जादादरासाठी माननीय खासदार यांना निवेदन सादर
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी : भरत शिंदे
अतिग्रे तालुका हातकणंगले मधून जाणाऱ्या रत्नागिरी नागपूर प्रस्थापित महामार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनी व मिळकत धारकांना जादा दराने नुकसान भरपाई मिळावी व अतिग्रे मध्ये बेघर वस्ती पूर्णपणे भूमिहीन होणार आहे ,
तर त्यांना योग्य स्वरूपाचा मोबदला मिळावा यासाठी अतिग्रे गावचे लोकनियुक्त सरपंच माननीय श्री सुशांत वड्ड उपसरपंच व सर्व सदस्य तसेच अतिग्रे गावातील बाधित शेतकरी व मिळकत धारक यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील लोकप्रिय खासदार माननीय श्री धैर्यशील माने दादा सो यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी उपस्थित लोकनियुक्त सरपंच माननीय श्री सुशांत वड्ड, माजी सरपंच प्रशांत गुरव ,जयवंत पाटील सर ,प्रदीप पाटील ,संग्राम पाटील ,संजय सूर्यवंशी ,मेजर जयसिंग मुसळे ,शीलवंत बिडकर ,सागर खोत ,भरत शिंदे ,संतोष कांबळे, व बाधित मिळकतदार व शेतकरी उपस्थित होते
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636