सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सुदर्शन घुले व सुधीर सांगळे याला पुण्यातुन अटक .
सर्व आरोपी पुण्यातुनच अटक सुप्रिया सुळे यांनी केले संशयवक्त आश्रय देणारे कोण आहेत पोलीसांनी शोधुन काढावे, देशमुख प्रकरणात बीडच्या विशेष पोलीस पथकाला यश
पुणे न्यूज एक्सप्रेस :
चंद्रशेखर पात्रे : जिल्हा प्रतिनिधी
पुणे दि ४ :- सरपंच संतोष देशमुख यांचा हत्येने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाले आहे या बाबत विरोधकांसह अनेक स्तरावरून सरकार वर टिकेची जोड होत होती आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात फरारी घोषित केलेल्या तिघांपैकी दोघांना पकडण्यात बीडच्या विशेष तपास पथकाला यश आले आहे.
सुदर्शन चंद्रभान घुले (वय २६, रा. टाकळी, ता. केज) आणि (वय २३, रा. टाकळी, ता. केज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेतसरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात बीड विशेष तपास पथकाने डॉ. संभाजी वायभसे याला ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडील चौकशीत मिळालेल्या माहितीवर गोपनीय माहितगार नेमून तसेच तांत्रिक कौशल्याचा उपयोग करुन या दोघांना बीड विशेष तपास पथकाने ताब्यात घेतले. अधिक तपासासाठी दोघांना गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) बीड पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची ९ डिसेंबर रोजी हत्या केली होती. राज्याच्या अधिवेशनात हे प्रकरण गाजले होते. हत्येनंतर आरोपी पळून गेले होते. बीड पोलिसांना आरोपी सापडत नसल्याने विरोधकांनी याच्या मागे मंत्री धनंजय मुंडे यांचा हात असल्याची टिका विरोधकांकडून केली जाऊ लागली. तेव्हा राज्य शासनाने हत्या व खंडणीचा गुन्हा सीआयडीकडे वर्ग केला. त्यांनाही आरोपी सापडत नव्हते. शेवटी वाल्मिक कराड हा सीआयडीच्या पुणे कार्यालयात स्वत: शरण आला. त्यानंतर बीड विशेष तपासाने फरारापैकी दोघांना पुण्यातून ताब्यात घेतले. सर्व आरोपी हे पुण्यामधुन अटक होत असल्याने संतोष देशमुख यांच्या परिवाराने हे सर्व आरोपी पुण्यातुनच कसे काय सापडले आहेत यांना कोण अश्र्य दिले हे शोधले पाहिजे खासदार सुप्रिया सुळे यांनी ही याबाबत नवल व्यक्त केले आणी माध्यमांशी बोलताना म्हणाले आज दोन आरोपी हे पुण्यामधुन अटक झाले पण वाल्मिकी कराड ला ही पुण्यामधुन अटक झाले म्हणजे हे एकामेकांच्या संपर्कात असतील असा संशय व्यक्त केला प्रकरण बीड मध्ये असेलेतरी आरोपी मात्र पुण्यातुन अटक होत आहे यांचे मागचे पाठीराखे कोण आहेत हे आता पोलीसांनी शोधुन काढले पाहिजे असे माध्यमाशी बोलत होते देशमुख हत्या प्रकरण वर आता सर्व स्तरातून टीका होत आहे तर अख्या महाराष्ट्राचे लक्ष लागुन आहे.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636