सुफी संत हजरत सय्यदी पीर ऐनी शाह सहाब किब्ला (रहे) यांचा 9 वा उर्स 15 फेब्रवारी रोजी साजरा करण्यात येणार.


पुणे न्यूज एक्सप्रेस :

 

पुणे : सूफी संत हजरत सव्यदी पीर ऐनी शाह सहाब किब्ला (रहे) यांचा उर्स उर्द् ता. १६ व इंग्रजी महिना तारीख 15 फेव्रुवारी वार शनिवार रोजी साजरा करण्यात येणार आहे.गेल्या आठ वर्षापासून हजरत यांचा ऊर्स मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो , हा 9 वा उरूस आहे

Advertisement

 

हजरत यांची मजार शरीफ पुणे स्थित भवानी पेठ दुल्हा दुल्हन कब्रिस्तान येथे आहे. या ठिकाणीच उरूस साजरा करण्यात येतो .सुफी संत हजरत ऐनी शहा (रहे) यांचा ऊर्स हजरत यांचे वारसदार (जानशिन) हजरत शाह नजीरूद्दीन कादरी उर्फ (मखदुमी) शाह यांचे मार्फतच उरुसाचे सर्व नियोजन केले जाते. त्यांचे प्रमुख गुरू मौलांना गौसवी शहा सहाब ( हैदराबाद) यांचे पुर्व परवानगीने व त्यांचे आदेशा नुसार करतात. सुफी संत हजरत ऐनीशाह (रहे.) यांचे मुरीद (शिष्य) अखंड महाराष्ट्र्भर आहेत. हजरत यांचे सर्व शिष्य हजर राहन उर्साचे सर्व कामकाज पाहतात. सायंकाळी असरच्या नमाज नेतर हजरत यांचे मजार शरीफ वर गिलाफ चादर चढ़वण्यात येते व मजार शरीफवर फुल पान करण्यात येतो, लगेच फातिहा व दुवा करण्यात येते. यानंतर शाह नजीरूद्दीन कादरी उर्फ (मखुदमी शहा) यांचे बयान, होते. यानंतर महाप्रसाद (भोजन) चा कार्यक्रम होतो. व नंतर महिफिले समाचा कार्येक्रम झााले नंतर कार्येक्रम सांगता होते.


pune news express

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page