राष्ट्रीय समाज रत्न पुरस्कार 2025 साठी सय्यद अशफाक अली यांची निवड
पुणे न्यूज एक्सप्रेस :
छत्रपती संभाजीनगर : शहरातील काँग्रेस माथाडी कामगार मराठवाडा सरचिटणीस व ज्येष्ठ पत्रकार मा. सय्यद अशफाक अली सय्यद साबेर अली यांची पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची राष्ट्रीय समाज रत्न पुरस्कार 2025 साठी निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील आघाडीची वृत्तसंस्था प्रेस मीडिया लाईव्ह (ज्यांची नोंद क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे) तर्फे हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 29 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत सांगली येथे पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार असून, कार्यक्रमाचे ठिकाण लवकरच जाहीर होणार आहे.
सय्यद अशफाक अली यांनी काँग्रेस माथाडी कामगार संघटनेच्या माध्यमातून अनेक जनसामान्यांच्या समस्या शासन दरबारी मांडून त्या मार्गी लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या सामाजिक बांधिलकीबद्दल आणि पत्रकारितेतील कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. या यशाबद्दल अब्दुल कय्यूम पत्रकार,रफिक पठाण, मुस्ताकीम पठाण, अयान खान, आझीम खान, सादिक इनामदार आदींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
प्रेस मीडिया लाईव्हचे मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान (पुणे) यांनीही सय्यद अशफाक अली यांचे अभिनंदन करताना म्हटले की, “सामाजिक क्षेत्रात आणि पत्रकारितेत केलेले कार्य अनुकरणीय आहे. त्यांना मिळालेला हा मानाचा बहुमान अभिमानास्पद आहे.”
—

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636