संजय गांधी निराधार योजनेचे मंजुरी पत्र वाटप सोहळा सोमवारी संपन्न होणार –समिती अध्यक्ष डाळ्या यांची माहिती
पुणे न्यूज एक्सप्रेस :
उमाकांत दाभोळे :
इचलकरंजी : सोमवार दिनांक 14 ऑक्टोंबर रोजी घोरपडे नाट्यगृह येथे सकाळी दहा वाजता 8-7-24 रोजी झालेले मिटिंगची मंजुरी पत्र वाटप सोहळा खासदार धनंजय महाडिक, हातकणंगले चे खासदार धैर्यशील माने तसेच इचलकरंजी आमदार प्रकाशराव आवाडे व माजी आमदार व भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हळवणकर साहेब यांच्या शुभहस्ते तसेच जिल्हा शिवसेनाप्रमुख रवींद्र माने, भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे, भाजप शहराध्यक्ष अमृतामामा भोसले व शिवसेना शहर प्रमुख भाऊसो आवळे तसेच प्रकाशराव दत्तवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
Advertisement
महाराष्ट्रात लवकरच निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्यामुळे लाभार्थ्यांची हेळसांड व आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून समिती अध्यक्ष अनिल डाळ्या यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे घोरपडे नाट्यगृह येथे सोमवार 14 10 24 रोजी सकाळी दहा वाजता होणार असून संजय गांधी लाभार्थी तसेच श्रावण बाळ लाभार्थ्यांनी यावेळी उपस्थित राहून आपापले मंजुरी पत्र घ्यावे असे आवाहन समिती अध्यक्ष अनिल डाळ्या, सचिव अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने साहेब, तसेच समिती सदस्य सुखदेव माळकरी, कोंडीबा दवडते, संजय नागोरी, तमन्ना कोटगी, सलीम मुजावर, जयप्रकाश भगत, सो सरिता आवळे ,महेश ठोके तसेच महेश पाटील यांनी केले आहे
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636