कर्तव्यदक्ष पोलीसाने वाचविले महिलेचे प्राण .
पुणे न्यूज एक्सप्रेस :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर – सीपीआर अपघात विभागा समोर पोलिस चौकी असून या रुग्णालयात दाखल होणारे रुग्ण यात अपघात, मारामारी, गळफास आणि इतर कारणांनी दाखल होणारया रुग्णांची माहिती घेऊन संबंधित पोलिस ठाण्याला दिली जाते.असे कितीतरी पेंशट सीपीआर रुग्णालयात दाखल होत असतात.त्यातच सीपीआर रुग्णालयात काही नातेवाईक नसलेले ही रुग्ण दाखल होत असतात त्यांच्या कागदपत्राची चौकशी करूनच पुढ़ील उपचार केले जातात.
Advertisement
ही ड्युटी बजावताना त्यांना तारेवची कसरत करावी लागते.थोडी जरी चूक झाली तर संबंधित पोलिसाला जबाबदार धरले जाते. अशातच शनिवार (दि.14) रोजी सीपीआर येथे केस पेपर काढ़ण्यासाठी आलेल्या महिला अचानक बेशुध्द झाल्याने त्या वेळी सीपीआर पोलिस चौकीत कर्तव्यावर असलेले पोहे कॉ .588 .एस.आर.हेगडेपाटील हे स्ट्रेचरची किंवा सीपीआर मधील वॉर्ड बॉयची वाट न पाहता स्वतः बाहेर येऊन त्या महिलेस स्वतः उचलुन तात्काळ अपघात विभागात उपचारासाठी दाखल करून त्यांच्यावर डॉक्टरांनी वेळीच उपचार केल्याने त्यांचा जीव वाचल्याने संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी त्या कर्तव्यदक्ष पोलिसाचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.या पोलिसाने दाखविलेल्या कृतीची सीपीआर आवारात दिवसभर चर्चा चालू होती.

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636