पंचगंगा नदी किनारी श्री वरविनायक मंदीरात गणेश जयंती सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला
पुणे न्यूज एक्सप्रेस :
इचलकरंजी : पंचगंगा नदी किनारी इचलकरंजी वासियांचे आराध्य दैवत श्री वरविनायक मंदीरात गणेश जयंती सोहळा उत्साहात पार पडला इचलकरजी महानगर पालिकेचे आयुक्त श्री व सौ ओम प्रकाश दिवटे यांच्या शुभ हस्ते पाळणा व श्री वरद विनायकाची पूजा करण्यात आली. तर सकाळी श्री व सौ आकाश स्वामी यांच्या हस्ते श्री वरद विनायकाची अभिषेकसह विधिवत पुजा करण्यात आली .
इचलकरंजी येथील पंचगंगा वरदविनाक मंदिरात गणेश जन्मसोहळा, पाळणागीत आदी कार्यक्रमांनी आणि गणेशभक्तांच्या साक्षीत गणेश जयंती पारंपरिक पध्दतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गणेशभक्तांनी उत्सवात सहभागी होताना पाळण्यातील बाल गणरायाचे दर्शन घेऊन श्रींच्या चरणी आपली सेवा अर्पण केली. विविध धार्मिक विधी पार पाडण्यात आले. फुलांच्या माळा लावून आणि विविध फुलांची आकर्षक आरास मांडून वरदविनायकाची सजावट करण्यात आली.
शहरातील नदी किनारी श्री वरदविनाक गणपती मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाईत धार्मिक कार्यक्रमांसाठी सज्ज करण्यात आले होते. आज दुपारी गणेश मंदिरांत विधिवत पद्धतीने गणेश जन्मोउत्सव सोहळा साजरा करण्यात आला. तसेच गणेश याग, श्री अभिषेक, पंचामृत आरती, प्रदक्षिणा, गणेश आरती असे धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले. जयंतीच्या पूर्वसंध्येला विद्युत रोषणाईत न्हाऊन निघाले होते. भाविकांची सकाळपासूनच मंदिरात रेलचेल सुरू होती. जन्मकाळ साजरा झाल्यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.विविध रांगोळी फुलांच्या व नाविन्यपूर्ण सजावटीमुळे वरदविनायकाचे रूप अधिकच खुलले. याठिकाणी महिलांनी मोठी गर्दी केली. जास्वंदीची फुले, दुर्वांचे हार व मोदक तीळाचे लाडु अर्पण करून भाविकांनी श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले.
या निमित्त उद्या बुधवार दिनांक १४/२/२०२४ रोजी दुपारी १२वा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी, मंडळाचे उपाध्यक्ष श्री* बाळासाहेब जांभळे, माजी नगरसेविका सौ कलावती जांभळे ,द्वारकाधीश सारडा, श्यामजी काबरा प्रकाश कलागते, हणमंत वाळवेकर,शितल पाटील, बाळासाहेब बेलेकर, बाळासाहेब मिठारी, पंडित काजवे शिवबसु खोत मुळचंद नानावटी, विष्णू शिंदे ,विनायक रेडेकर, बजाज शर्मा, प्रशांत चाळके, सुनील ताडे, विश्वनाथ मेटे, गजानन स्वामी, शिवानंद भाबिस्टे,राहुल जाणवेकर, राजु तलंदगे,मोहन नाझरे, प्रितंम पोटे सुधीर जाधव गजानन पाटील वैभव काळे संग्राम स्वामी, युवराज शाह इत्यादी कार्यकर्ते मंदिर भक्त मंडळ भक्तगण उपस्थित होते.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636