NEET चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे वडील धोंडीराम भोसले यांनी केलेल्या बेदम मारहाणीत मुलीचा मृत्यू
सांगली : बारावीत विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या साधना भोसले हिला NEET चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे तिचे वडील धोंडीराम भोसले यांनी साधनाला इतके कमी गुण कसे पडले?” असा जाब विचारत त्यांनी रागाच्या भरात साधनाला लाकडी खुंट्याने मारहाण केली
या मारहाणीत साधना गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला. वडील स्वतः नेलकरंजी येथील एका खाजगी माध्यमिक शिक्षण संस्थेत मुख्याध्यापक आहे ही धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे शुक्रवारी रात्री सुमारे 9.30 वाजता घडली.
विशेष म्हणजे, इतकी गंभीर स्थिती असूनही तिच्या वडिलांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात नेलं नाही. त्याऐवजी दुसऱ्या दिवशी सकाळी ते योग दिन साजरा करण्यासाठी शाळेत निघून गेले. घरी परतल्यावर त्यांना साधनाला बेशुद्ध अवस्थेत आढळून आली त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, तिथे पोहोचण्यापूर्वीच साधनाचा मृत्यू झाला होता.
घटनेनंतर साधनाची आई प्रीती भोसले यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर रविवारी पोलिसांनी आरोपी वडील धोंडीराम भोसले यांना अटक केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636