देहूरोड परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट लहान मुलांचे व वयोवृद्ध नागरिकांचे जीव धोक्यात
The loose dogs in the Dehuroad area are endangering the lives of children and elderly citizens
पुणे न्यूज एक्सप्रेस :
अन्वर अली शेख :
देहूरोड शहर आंबेडकर नगर भागात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. जसे कुणी या परिसरात अनेक मोकाट कुत्रे आणून सोडले आहे अशी शंका व्यक्त होत आहे. गल्ली बोळात सात आठ कुत्र्यांचा घोळका एक दम समोर आल्याने लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती यांना त्रास होत असल्याचे दिसून येत आहे, लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना जीव धोक्यात घालून परिसरात वावर करावा लागत आहे. लहान मुलांना वयोवृद्धांना कुत्र्याने जर चावा घेतला किंवा या धावपळीमध्ये पडून कुणाचा हात पाय मोडला तर त्याला जबाबदार कोण ?म्हणून देहूरोड शहर छावणी प्रशासनाने त्वरित या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी नागरिकांची सातत्याने जगो जागी चर्चा सुरू आहे.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636