बॅंकेच्या व्यवस्थापन व प्रशासनाने घेतली श्रीमती बिबी तुफलेहून ईनामदार यांच्या कामाची सुयोग्य दखल
- सुयोग्य दखल – कार्य कर्तव्याची !
पुणे : स्टाफ वेल्फेअर फंड ट्रस्टच्या सचिव पदाची धुरा सक्षमपणे सांभाळणाऱ्या बँकेच्या कर्मचारी श्रीमती बिबी तुफलेहून ईनामदार यांच्या कामाची सुयोग्य दखल बॅंकेच्या व्यवस्थापन व प्रशासना कडून घेण्यात आलेली असून, दिनांक २९/१०/२०२४ बुधवार रोजी स्टाफ वेल्फेअर अँड डेव्हलपमेंट ऑफिसर पदी नियुक्तीची प्रमोशन ऑर्डर बँकेचे अभ्यासू मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मोहंम्मद रफीक शेख सर व बँकेच्या कर्ज वसुली समितीचे अध्यक्ष तथा सन्माननिय संचालक श्री. बबलूभाई सय्यद यांच्या हस्ते श्रीमती तुफ्लेहून मॅडम यांना देण्यात आली.
यावेळी बँकेचे जनरल मॅनेजर श्री. सईदभाई मुल्ला, एसआरओ रशिदभाई धोंडफोडे, ऍडमिन मॅनेजर श्री. अनिसभाई काझी, आयटी मॅनेजर श्री. अझीमभाई शेख, कंप्लायंस ऑफिसर श्री. अय्याजभाई खान, मॅनेजर नाजीमभाई मुल्ला ई. बँकेचे अधिकारी उपस्थित होते.
श्रीमती तुफ्लेहून मॅडम यांनी स्टाफ वेल्फेअर फंड ट्रस्टची जबाबदारी स्विकारल्यापासून – कर्मचाऱ्यांचे फॅमिली सह गेट टुगेदर चे मागील २ वर्षापासून यशस्वी नियोजन व त्या माध्यमातून यशस्वी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून विविध शालेय उपयोगी साहित्याचे वाटप सह आर्केस्ट्रा, फनफेअर, जेवण असेल अथवा कर्मचाऱ्यांचे किंवा त्यांच्या कुटुंबियांचे मेडिकल बिल रीएम्बर्समेंट चा दीर्घकालीन रखडलेला प्रश्न असेल, अथवा मागील २ वर्षापासून देणे बाकी असलेली कर्मचाऱ्यांच्या पाल्यांची higher education ची tution fees असेल व त्यासह चालू वर्षाची इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतची tution fees चा मुद्दा असेल (यंदा फार कमी प्रमाणात tution fees साठी निधी प्राप्त झाला होता परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील यावर योग्य तो तोडगा काढत सबकी बराबरकी हिस्सेदारी या तत्त्वानुसार सर्वांना खारीचा का वाटा मिळत नाही, पण तो मिळणे जरुरी आहे या धोरणाचा अवलंब करून ट्यूशन फीस चा प्रश्न मार्गी लावला गेला) ई. सर्व कार्यक्रम/ मुद्दे / प्रश्न बीबी तुफ्लेहून मॅडम यांनी यशस्वी पणे उत्तम नियोजनासह हाताळलेले आहेत.
येणाऱ्या काळात बँकेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी व बँकेच्या वेगवान प्रगतीच्या इंजिनची चाके / व्हिल्स म्हणून काम करणाऱ्या बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना / धोरणे / कार्यक्रम राबविण्यासाठी, अंमलात आणण्यासाठी बीबी तुफ्लेहून मॅडम यांचे मोलाचे कर्तव्य असेल यात शंका नाही.
आपल्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनस्वी शुभेच्छा व मा. मोहंम्मद रफिक शेख सरांनी मॅडमच्या कार्यकर्तव्याची दखल घेऊन त्यांच्या प्रती जो विश्वास दाखवून कामाची पोचपावती म्हणून जी प्रमोशन ऑर्डर दिलेली आहे त्यासाठी धन्यवाद !
इरफान गुलामअली शेख
डेप्युटी मॅनेजर, कर्ज वसुली विभाग

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636