पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेतील 93 रजा मुदत शिक्षण सेवकांना मानधन सहा हजार वरून 16000 करण्यात आले.


पुणे न्यूज एक्सप्रेस :

पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेतील 93 शिक्षण सेवकांना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या आदेशानुसार सर्व 93 रजा मुदत शिक्षकांचे मानधन सहा हजारावरुन 16 हजार करण्यात आले आहे . त्या मुळे यंदाची दिवाळी गोड होणार आहे यासंदर्भातील परिपत्रक महानगरपालिकेने काढले आहे. त्यामुळे शिक्षण सेवकांनी आनंद व्यक्त करण्यात आला आहे.

पुणे महापालिकेच्या प्राथमिक शाळेत गेली 14 वर्षे मानधनावर काम करणाऱ्या 93 शिक्षणसेवकांना उच्च न्यायालयाने शिक्षण सेवेत कायम करुन वेतनश्रेणी लागू करण्याचे आदेश फेब्रुवारी 2023 मध्ये दिले होते. यासाठी न्यायालयाने सहा आठवड्यांची मुदत दिली होती. मात्र, महापालिकेच्या शिक्षण विभागाने या आदेशावर कार्यवाही केलेली नव्हती.त्यामुळे सर्व शिक्षण सेवकांनी जून २०२३ मध्ये आंदोलनाचा पवित्रा घेत महापालिकेच्या विरोधात निदर्शने केली होती.

Advertisement

यावेळी जिल्ह्याचे तत्कालिन पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मध्यस्थी करुन शिक्षण सेवकांना न्याय देण्याचे आश्वस्त केले होते. त्यांनी आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी चर्चा करुन तत्काळ सर्व ९३ शिक्षण सेवकांना कायम करुन वेतन श्रेणी लागू करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार, महापालिकेने फेब्रुवारी २०२३ च्या शासन आदेशानुसार सर्व ९३ शिक्षण सेवकांना सहा हजारावरुन १६ हजार मानधन करण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबतचे परिपत्रक आज जारी करण्यात आले. परिपत्रकाद्वारे वित्त विभागाला तातडीने वेतन अदा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व शिक्षण सेवकांनी आनंद व्यक्त केला असून या वर्षीची दिवाळी आनंदाने साजरी करणार.


pune news express

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page