पंछी सुर मे गाते है च्या वतीने वृत्तपत्र विक्रेत्यांना सत्कार
पुणे न्यूज एक्सप्रेस :
कोल्हापूर : मुरलीधर कांबळे
कोल्हापूर- थंडी ,ऊन,वारा आणि पाऊस याची तमा न बाळगता घरोघरी वृत्तपत्र देत असलेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी कोल्हापुरातील “अमर कांबळे प्रस्तुत “पंछी सूर मै गाते है”यांच्या टिमच्या वतीने शाहू स्मारक भवन येथे वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार करण्यात आला.
या अनोख्या झालेल्या सत्कारामुळे वृत्तपत्र विक्रेते भारावून गेले.”पंछी सूर मै गाते है.”या ग्रुपचे अमर कांबळे,सुजित दिंडे आणि राजू अपराध यांच्या हस्ते गुलाबपुष आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.वृत्तपत्र विक्रेते हे पहाटे उठून अंक वाटप करतात.अंक वाटप करत-करत चालू असलेले नळाचे पाण्याचे कॉक बंद करून वाया जाणारे पाणी ग्राहकांच्या पाणी बिलात आर्थिक बचत या वृत्तपत्र विकेत्याच्या मुळे होते.या झालेल्या सत्कारा वेळी महाराष्ट्र राज्य संघटनेचे उपाध्यक्ष रघुनाथ कांबळे यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कार्याची दखल घेऊन जो सन्मान केला त्या बद्दल आयोजकांचे आभार मानले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्निल पन्हाळकर यांनी केले.या वेळी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संघनेचे उपाध्यक्ष रघुनाथ कांबळे,स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता व एंजट असो.चे अध्यक्ष किरण व्हनगुते,परशुराम सावंत,महानगर वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष रवि लाड ,संभाजीनगर डेपोचे अध्यक्ष राजाराम पाटील,राजारामपुरी डेपोचे अध्यक्ष आसिफ मुल्लाणी ,रमेश जाधव,महेश घोडके ,कृष्णात शहापूरे ,अंकुश परब ,सुरेश ब्रम्हपुरे ,सतीश दिवडे यांचा प्राथमिक स्वरुपात सत्कार करण्यात आला.तसेच वृत्तपत्र विक्रेते हर्षदा कदम ,श्रमिक पाटील ,गोकुळ पाटील आणि मुरलीधर कांबळे यांच्यासह चारी डेपोचे पदाधिकारी आणि वृत्तपत्र विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636