पोलिस दलातील दोघं सख्खे भाऊ निलंबीत.
पुणे न्यूज एक्सप्रेस :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर – पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांनी पोलिस दलात कार्यरत असलेले दोघे सख्खे भाऊ एक जण हवालदार तर दुसरा पोलिस उपनिरीक्षक असलेल्या दोघांना निलंबीत केल्याची घटना घडली आहे.विजय शिंदे आणि रमेश शिंदे अशी त्यांची नावे आहेत.
अधिक माहिती अशी की,हे दोघे सख्खे भाऊ पोलिस दलात वेगवेगळ्या पदावर कार्यरत असून त्यांची पोलिस दलात वादग्रस्त पोलिस अशी त्याची ओळख आहे.त्यांनी आपल्या पदाचा वापर करून त्यांनी बेकायदेशीर कामं करत त्यांनी काही जणांना जातीचे खोटे दाखले दिल्याने त्यांची नावे चर्चेत होती.या बाबतच्या तक्रारी वरिष्ठ अधिकारी यांच्या प्रर्यत गेल्या होत्या.वरिष्ठ अधिकारी यांनी या दोघांची सखोल चौकशी करून ते दोषी असल्याचे सिध्द झाल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांनी त्यांना बंडतर्फ केले आहे.
ही माहिती समजताच हातकंणगलेसह शिरोळ तालुक्यात व इंचलकरंजी येथे या निर्णयाचे स्वागत करून समाधान व्यक्त केले.या दोघां सख्ख्या भावावर झालेल्या कारवाई मुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636