खंडणी उकळणाऱ्या दोघांना अटक . 13 तारखे पर्यन्त पोलिस कोठडी.तोतया पत्रकार अन्सार मुल्ला पसार !
पुणे न्यूज एक्सप्रेस :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- लक्ष्मीपुरी परिसरात असलेल्या प्लास्टिक व्यावसायिकाच्या दुकानात जाऊन तीन लाखांची खंडणी उकळणारया अजित पांडुरंग पवार (वय 47.रा.बिंदु चौक) आणि मयुर उर्फ गणेश मोहन कांदळकर (वय 40.रा.रविवार पेठ) यांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 13 तारखे प्रर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.
अन्सार रफिक मुल्ला हा तोतया पत्रकार पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.या मध्ये आणखी काही जणांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांना सीसीटिव्ही फुटेजच्या माध्यमातून मिळाली आहे.यातील काही जणांनी
‘ तुझा प्लॅस्टिकचा व्यापार आहे. बेकायदेशिर व्यापार करतोस, त्यामुळे शासनाच्या संबंधीत विभागाला बोलवून तुझे दुकान बंद करतो. ते टाळायचे असेल तर मला पाच लाख खंडणी देण्याची मागणी केली असता दर्डा भयीत होऊन पैशाची जुळवा जुळव करून ३ लाख रुपये तोतया पत्रकार अन्सार रफिक मुल्ला (वय ४० रा. कोल्हापूर) याला दिले होते.
परत तोतया पत्रकार आपल्या साथीदारांसह येऊन पाच लाखांची खंडणी मागून नाही दिल्यास जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.दर्डा यांनी त्यांच्याकडे वेळ मागून तेथून त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पवार आणि कांदळकर यांना अटक केली तर तोतया पत्रकार अन्सार मुल्ला याच्यासह त्याच्या आणखी साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत.
पत्रकार म्हणून मिरवणारा तोतया अन्सार मुल्ला याच्यावर आजपर्यत गंभीर स्वरुपाचे तीन गुन्हे दाखल आहेत. महिलेची फसवणूक केल्याचा गुन्हा शाहूपुरी पोलीसात दाखल आहे.लक्ष्मीपुरी पोलीसात गुन्हा दाखल झाल्यामुळे त्याच्या आणि त्याच्या साथीदारांच्या अटकेनंतरच त्याचे कारनामे बाहेर पडणार आहेत.

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636