शेतकरी आत्महत्या मुळे एकल झालेल्या भगिनींसाठी उदयकाळ फाउंडेशन अंतर्गत किसानपुत्रांनी भाऊबीज साजरी केली.
पुणे न्यूज एक्सप्रेस :
दरवर्षी प्रमाणे उदयकाळ फाउंडेशन संस्थेने किसानपुत्रांची भाऊबीज कार्यक्रम पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात शेतकरी आत्महत्या झालेल्या कुटुंबातील महिलांना त्यांची दिवाळी गोड होण्यासाठी त्यांना किराणा साहित्य आणि त्यांच्या बालकांसाठी ‘लाडोबा’ मासिकाचा दिवाळी अंक भेट दिला.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मा. कमल तिवारी, प्राध्यापक NDA, पुणे), डॉ.शारदा तिवारी, श्री. सतीश देशमुख, किसानपुत्र आंदोल, श्री. राम माने, सचिव आंतर भारती, पुणे, श्री. बाळकृष्ण बागुल, अध्यक्ष – उदयकाळ फाउंडेशन, सौ. प्रभावती बागुल, सौ. सिमा गुत्ते, सामाजिक कार्यकर्ते व युवा सामाजिक कार्यकर्ते मयूर बागुल हे उपस्थित होते. सदरील कार्यक्रमात उपस्थित महिलांनी आपले मनोगत सांगत असतांना कौटुंबिक जबाबदारी आणि मुलांचा सांभाळ करत असतांना असंख्य समस्या आणि अडचणी येत असतात. किसानपुत्र आंदोलन यांनी हा उपक्रम राबवला आणि आमची आणि मुलांची दिवाळी गोड होण्यासाठी आम्हांला भाऊबीज भेट दिली त्याबद्दल आभार मानले.
या उपक्रमात मुलांना चपराक प्रकाशन संस्थेचा लाडोबा बाल साहित्य दिवाळी अंक मुलांना साहित्यिक दिवाळी भेट दिला. चपराक प्रकाशन संस्थेचे श्री. घनश्याम पाटील यांनी दिवाळी निमित्ताने बालकांना सुट्टीचा विविध गोष्टी आणि कथा यांचा साहित्यिक खाऊ भेट यानिमित्ताने दिला. एकूण १२५ महिलांना दिवाळी किराणा साहित्य किट संपूर्ण महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात वाटप होत आहे.
मयुर बागुल यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
#diwali #celebration #FestiveVibes #womens #foundation #kids #happiness
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636