वाचन संकल्प महाराष्ट्राचा पंधरवडा साजरा करण्यात आला.
श्री बाळासाहेब माने शिक्षक प्रसारक मंडळ अंबप , संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन ,(बी.एड) पेठ वडगाव . या महाविद्यालया मध्ये 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2025 पर्यंत वाचन संकल्प महाराष्ट्राचा पंधरवडा साजरा करण्यात आला.
9 जानेवारी 2025 गुरुवार या दिवशी श्रीमती इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज पेठ वडगाव या शाळेच्या मुलांसाठी *ग्रंथालय भेट* असा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये इयत्ता सातवी चा वर्ग घेऊन त्यांच्यासाठी ग्रंथ प्रदर्शन व सर्वांसाठी मुक्त वाचन प्रवेश उपलब्ध करून दिला आणि सर्व मुलांनी छोट्या छोट्या गोष्टीरुपी पुस्तकांचा आस्वाद घेतला. या उपक्रमासाठी प्राचार्या डॉ. निर्मळे आर एल मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले व सर्व प्राध्यापक व ग्रंथपाल या सर्वांनी मिळून या कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यासाठी प्राध्यापक सोरटे सर , सावंत मॅडम, ग्रंथपाल चौगुले मॅडम यांनी योग्य ते मार्गदर्शन केले. या पंधरवड्यातील सर्व उपक्रमांसाठी संस्था अध्यक्ष माननीय विजयसिंह माने साहेब यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.
हा उपक्रम संपन्न करण्यासाठी श्रीमती इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज पेठ वडगाव या शाळेचे ग्रंथपाल श्री उदय पाटील सर तसेच कॉलेजच्या प्राचार्या डॉ. निर्मळे आर.एल., प्रा. सोरटे एस. के. प्रा. शिरतोडे व्ही.एल. प्रा. सावंत ए.पी. प्रा. पवार ए. आर. ग्रंथपाल चौगुले एस. एस., श्री चव्हाण आर. आर.व सर्व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636