खा.महाडिक यांच्या प्रयत्नातून “वंदे भारत “रेल्वे सुरु.
पुणे न्यूज एक्सप्रेस :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूर- पुणे वंदे भारत एक्सप्रेसला सोमवारी ऑनलाईन च्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवून उदघाटन करण्यात आले.या वेळी कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही.सोमण्णा ,खासदार छत्रपती शाहू महाराज,खा.धनंजय महाडिक ,खा.धैर्यशील माने,सत्यजित उर्फ नाना कदम यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
खा.धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून कोल्हापुरात पहिली वंदे भारत एक्सप्रेस पुण्याला रवाना झाली.ही रेल्वे सुरु झाली आणि काही स्टेशनना मागे टाकत बघता बघता मिरज स्टेशन गाठले.ह्यातुन प्रवास करत असताना एक वेगळाच आनंद मिळाल्याचे प्रवाशांनी सांगितले.या गाडीचा वेग आणि आतील स्वछता पाहून मन भारावून गेले.कोल्हापूर रेल्वे स्थानकावर या रेल्वे सोबत सेल्फी काढ़ण्यासाठी उपस्थितीतांनी गर्दी केली होती.
या सुरु झालेल्या वंदे भारत तिकीटाचा दर “चेअर क्लास जेवणासह नाष्टा 1160/रुपये.आणि जेवण नको असेल तर 795रुपये.तसेच एक्झिक्युटिव्ह चेअर 2005 /रपये.यात जेवणासह नाष्टाचा समावेश आहे.आणि जेवणाशिवाय 1575/रुपये असा दर असून यात बदल होण्याची शक्यता असल्याचे सांगितले.
या वंदे भारत एक्सप्रेसच्या शुभारंभ प्रसंगी शालेय विद्यार्थांना मिरज प्रर्यत मोफत प्रवासाबरोबर ब्रेकफास्टची सोय करण्यात आली होती.यात शाहू इंग्लिश स्कुल,बर्डस स्कुल आणि मॉडेल स्कुलचा समावेश होता. खा.धनजंय महाडिक यांनी वंदे भारत एक्सप्रेस शुभारंभाचे औचित्य साधून. कोल्हापूर ते मिरज मोफत प्रवास करण्याची संधी उपलब्ध करून दिल्यामुळे प्रवाशांनी कृतज्ञता व्यक्त केली
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636