पुणे न्यू एक्सप्रेस तर्फे ज्येष्ठ उर्दू पत्रकार मोहम्मद जावेद मौला यांची सर्वोत्कृष्ट उर्दू पत्रकारिता पुरस्कारसाठी निवड
पुणे : येथील आघाडीची वृत्त संस्था पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे पुणे येथील ज्येष्ट व महान उर्दू पत्रकार मा. मोहम्मद जावेद मौला यांनी उर्दू पत्रकारिता मध्ये करत असलेली उल्लेखनीय कामगिरी खरोखरच कौतुकास्पद आहे . त्यांनी बरेच पत्रकार देखील घडवले , त्यांनी नेता ते अभिनेता पर्यंत घेतलेल्या मुलाखती अविस्मरणीय ठरलेल्या आहेत.
Advertisement
ज्येष्ठ उर्दू पत्रकार मोहम्मद जावेद मौला यांचे बाबत जितकी लिहावे तितके कमीच आहे , अजूनही ते उर्दू पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत . अशा महान ज्येष्ठ उर्दू पत्रकार मोहम्मद जावेद मौला यांनी पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे त्यांची सर्वोकष्ट उर्दू पत्रकारिता पुरस्कार साठी निवड करण्यात आली आहे.
त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636