परभणी, सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी व संसदेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर बेताल वक्तव्य प्रकरणी देहूरोड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीच्या वतीने विराट मोर्चा.
सर्व पक्षीय संघर्ष समितीच्या वतीने बहुजनानी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे समितीच्या वतीने आव्हान .
पुणे न्यूज एक्सप्रेस :
चंद्रशेखर पात्रे :
देहुरोड दि. :- देहूरोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीच्या वतीने परभणीत झालेल्या भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मारहाणीत झालेली हत्या व तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर संसदेत बेताल वक्तव्य करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात देहूरोड शहरात दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी दुपारी 3:00 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या वतीने तलाठी कार्यावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.
याबाबत देहुरोड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीच्या वतीने देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय येथे दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी बैठक घेण्यात आले होते या बैठकीत सर्वपक्षीय नेते सह सर्व पंचक्रोशीतील आंबेडकर भिमसैनिक सामाजिक संघटना गावोगावातील मंडळ व अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होऊन विराट मोर्चे चे निर्णय घेण्यात आला.
याबाबत डॉ बाबासाहेब आंबेडकर सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या वतीने धर्मपाल तंतरपाळे यांनी या विराट मोर्चा मध्ये बहुजन अनुयायीने बहुसंख्यने उपस्थित रहावे असे आव्हान केले आहे. हा विराट मोर्चा डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पासून पुणे मुंबई महामार्गाने सवाना उपहारगृह, वृंदावन चौक, भाजी मंडई येथून ऐतिहासिक नेताजी सुभाषचंद्र बोस चौक येथे याची सांगता होणार आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीच्या वतीने देहुरोड विभागातील डीसीपी यांना निवेदन दिले जाणार आहे तसेच जिल्ह्याच्या शासनाच्या वतीने जिल्हाधिकारीचे निवेदन तहसीलदार तलाठी यांना देण्यात येणार आहे.
माध्यमांशी बोलताना धर्मपाल तंतरपाळे यांनी हा आंदोलन कुठलाही जातीपातीचे नसून जे काय निंदनीय घटना या देशात घडत आहे घडली आहे हा विराट मोर्चा त्याचा साठी आहे संतोष देशमुख हत्या विरोधात हे मोर्चा काढण्यात येत आहे व न्याय मिळवून देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे तरी सर्व आंबेडकरी अन्यायी व इतर धर्मिया लोकांनी या विराट मोर्चामध्ये बहुसंखयांना उपस्थित राहावे असे अवाहन डॉ बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीच्या वतीने धर्मपाल तंतरपाळे यांनी केली आहे.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636