उद्यापासून इचलकरंजी शहरातील या भागात पाणीपुरवठा होणार खंडित
पाणी साठा जपुन वापरण्याचे जाहीर आव्हान
इचलकरंजी : जल शुद्धीकरण केंद्रामधील ‘ए’ झोन टाकीचा मुख्य व्हालव्ह नादुरुस्त झालने सदर व्हाॅल्व्ह दुरुस्त करनेचे काम तातडीने हाती घेणेत आले आहे. त्यामुळे शहरातील गावभाग, मंगळवार पेठ, महासत्ता चौक, वार्ड नंबर १० येथील पाणी पुरवठा खंडित झालेला आहे.
तरी सदर नादुरुस्त व्हाॅल्व्ह बदलनेचे काम हाती घेणेत आलेले आहे. सदरचे काम पूर्ण होणे एक ते दोन दिवसाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.व्हाॅल्व्ह बसविले नंतर वरील नमूद भागात पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. तरी या परिसरातील नागरिकांनी पाणी पुरवठा सुरळीत होईतो पर्यंत आपल्या कडील पाणी साठा जपुन वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करणेत आले आहे

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636