शिवसेनेची ध्येयधोरणे घरोघरी पोचविण्यासाठी महिला सज्ज : सुलभा उबाळे
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पिंपरी, पुणे (दि.५ डिसेंबर २०२३) कोरोना काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जबाबदार कुटुंब प्रमुख या नात्याने जनतेची सेवा केली. हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य नागरिकांना शिवसेनेत बरोबर घेऊन मोठी पदे दिली. परंतु काहींनी शिवसेनेला अडचणीत आणून स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षात फूट पाडली. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष वाढविणे आणि पक्षाची ध्येयधोरणे घरोघरी पोचविण्यासाठी जबाबदारी महिला सक्षमपणे पार पाडण्यासाठी महिला सज्ज झाल्या आहेत असे प्रतिपादन जिल्हा संघटीका सुलभा उबाळे यांनी केले.
शिवसेनेच्या पिंपरी चिंचवड शहर महिला आघाडी पदाधिकारी यांचा नियुक्ती पत्र वाटप समारंभ सेना भवन आकुर्डी येथे आयोजित करण्यात आला होता. शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, पुणे शहर संपर्क प्रमुख सचिनभाऊ अहिर तसेच महिला आघाडी मावळ पिंपरी चिंचवड संपर्कप्रमुख लतिकाताई पाष्टे यांच्या मार्गदर्शनाखाली या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी सुलभा उबाळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा प्रमुख शैलाताई खंडागळे, शहर संघटीका अनिताताई तुतारे, शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले आणि चेतन पवार युवा अधिकारी पिंपरी चिंचवड, युवराज कोकाटे शहर संघटक, रेखाताई दर्शले माजी नगरसेविका, नितीन बोंडे आदी उपस्थित होते.
यावेळी पिंपरी, चिंचवड, भोसरी मधील अनेक महिलांनी पक्ष प्रवेश केला.
भोसरी विधानसभा संघटिका कल्पना शेटे, समन्वयक पिंपरी सुजाता काटे, गौरी घंटे, विभाग संघटिका सुजाता गायकवाड (अंजठा नगर), उपविभाग संघटिका साधना वाघमारे (भोसरी), शाखा संघटिका वंदना बनसोडे (अंजठा नगर), पिंपरी विधानसभा संघटिका डॉ. वैशाली अभय कुलते, समन्वयक पिंपरी चिंचवड वैभवी घोडके, उपशहर संघटिका कामिनी मिश्रा, सुषमा शेलार, विभाग संघटिका संगीता भारती (संत तुकाराम नगर), पुनम रिठे (पिंपरी) चिंचवड विधानसभा संघटिका मंगल भोकरे, समन्वयक चिंचवड विधानसभा उषा आल्हाट, उपशहर संघटिका रजनी वाघ, योगिनी मोहन, ज्योती भालके, विभाग संघटिका कमळ गोडांबे (पिंपळे सौदागर), वंदना वाल्हेकर (वाल्हेकर वाडी), वैशाली काटकर (चिंचवड), अमृता सुपेकर (रहाटणी), गीता कुसाळकर (वाकड), उपविभाग प्रमुख सुनिता सोनवणे (रहाटणी), श्रद्धा शिंदे (काळेवाडी), कलावती नाटेकर (चिंचवड), वंदना खंडागळे (पिंपळे सौदागर) हर्षाली घरटे(वाल्हेकरवाडी) तस्लीम शेख (काळेवाडी) या महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
संगिता परेश शाह, पुष्पा पाटील, राणी देवकर, रेहाना शेख, बालिका गुरव, प्रतीक्षा जाधव, खरात पाटील, आलिया शहा, वाल्या शहा, कविता जाधव, रोहिणी पाटील, लतिका कुंभार, किरण संहिता, सोनी वाघमारे, बालिका वाघमारे, समरिन भालेराव, मनीषा गडावर, अरूणा सुर्यवंशी, नविता शिंदे, राणी सुवासे, सुरेखा भवारे, मनीषा जाधव, श्रद्धा माडे, बेबी जगताप, सुजाता गायकवाड, वंदना बनसोडे, साधना वाघमारे आदींनी पक्ष प्रवेश केला त्यांचे स्वागत शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी केली.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636