सैनिक टाकळीत गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत व उत्साहात.
युनुस लाडखान :
सैनिक टाकळीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणपती बाप्पांना मोठ्या आनंदाने व उत्साहाने निरोप दिला.सायंकाळी सहाच्या दरम्यान सुरू झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुका रात्री बारापर्यंत पार पडल्या.
यावर्षी कित्येक मंडळांनी डॉल्बीला फाटा देत पारंपारिक वाद्य व सामाजिक उपक्रमांवरती भर दिला. यावर्षी शाहू कला कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ,राजा छत्रपती मंडळ यांनी महाप्रसादामध्ये नाविण्यपूर्ण गोडधोड जेवणाचे पदार्थ समाविष्ट करत तीन ते चार हजार लोकांना महाप्रसाद आस्वाद दिला.आझाद हिंद तरुण मित्र मंडळाने सामाजिक बांधिलकी राखून मिरवणुकीचा खर्च टाळून मराठा आंदोलनाला मदत केली.अवचित तरुण मंडळाची मिरवणूक टाळ मृदंगाच्या गजरात पार पडली.
रणझुंजार गणेशोत्सव मंडळाची ५० वी सुवर्ण महोत्सवी गणेश विसर्जन मिरवणूक पारंपारिक पद्धतीने बँड,बँजो यांच्या गजरात पार पडली.माधुरी हत्तीची प्रतिकृती तसेच ड्रॅगन प्रतिकृती कलात्मक रित्या मिरवणुकीमध्ये लक्ष वेधून घेत होत्या.मंडळाचे सर्व सभासद,महिला सर्वांनी फेटे बांधून या मिरवणुकीला शोभा वाढवली होती. मराठा स्वावलंब तरुण मंडळांने पारंपारिक वाद्याला प्राधान्य देत बँजो द्वारे बाप्पांना निरोप दिला.देशभक्तीची व वारकरी संप्रदायाची ओळख व्हावी म्हणून नवभारत तरुण मंडळाने ऑपरेशन सिंदूर ची प्रतिकृती व विठ्ठल रुक्माई च्या वेशभूषेतील कलाकार मिरवणुकीचे लक्ष वेधून घेत होते.राजश्री शाहू तरुण मंडळ व कल्लेश्वर तरुण मंडळ यांनी देखील पारंपारिक वाद्य, धनगर ढोल यांना प्राधान्य दिले होते.
अशाप्रकारे सैनिक टाकळीतील सार्वजनिक मंडळांनी मोठ्या उत्साहाने, आनंदाने व शांततेत गणपती बाप्पांना निरोप दिला.

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636