छत्रपती संभाजीनगर शहरातील रखडलेली विकासकामे डी.पी.सी. निधीतून पूर्ण करावीत – काँग्रेसची मागणी
पुणे न्यूज एक्सप्रेस :
छत्रपती संभाजीनगर :
मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी डी.पी.सी. (जिल्हा नियोजन समिती) कडे तब्बल २२ हजार कोटी रुपयांचा विकास निधी वर्ग केलेला आहे. या निधीतून छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्वच वार्डांतील दीर्घकाळ प्रलंबित असलेली विकासकामे पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी काँग्रेस माथाडी कामगार मराठवाडा सरचिटणीस अशफाक अली यांनी उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यांच्याकडे केलेली आहे.
Advertisement
मराठवाडा सरचिटणीस (माथाडी कामगार विभाग) सय्यद अशफाक अली सय्यद साबेरअली यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील भडकल गेट, काझीवाडा, आसेफिया कॉलनी, प्रगती कॉलनी, टाऊन हॉल, नुर कॉलनी, ज्युब्ली पार्क, कोहिनुर कॉलनी, पानचक्की, बारापुल्ला, कोतवालपुरा, तांडा, मिल कॉर्नर, गरम पाणी, रशीद मामू कॉलनी, आरेफ कॉलनी, लक्ष्मी कॉलनी, सिल्क मिल कॉलनी, हमाल वाडा, शहाशुक्ता कॉलनी, अंसार कॉलनी, पडेगाव, नंदनवन कॉलनी, कासंबरी दर्गा आदी भागांमध्ये अनेक मूलभूत सुविधा रखडलेल्या आहेत.
यामध्ये स्ट्रीट लाईट बसविणे, ड्रेनेज दुरुस्ती, रस्त्यांची डांबरीकरणे, पाणीपुरवठ्याचे नळ व गट्टू बसविणे तसेच इतर आवश्यक सुविधा यांचा समावेश आहे. नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधांसाठी हा निधी योग्य प्रकारे वापरून कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636