सचिनभाऊ खरात यांना धमकी देणाऱ्या हर्षवर्धन बारवरकर याला तात्काळ अटक करा..
फिरोज मुल्ला सर
पुणे.. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट )यांच्या वतीने मुख्यमंत्री सचिवालय कार्यालयात व जिल्हाधिकारी गृह कार्यालयात शिष्ट मंडळाच्या वतीने निवेदन देऊन हर्षवर्धन बारवरकर याला ताबडतोब अटक करून कडक कारवाईची मागणी करण्यात आली
राष्ट्रीय अध्यक्ष सचिनभाऊ खरात यांच्यावर शोषल मीडियावर आक्षेपार्ह अपमानस्पद मानहानिकारक वक्तव्य करून महाराष्ट्र राज्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण करत आहे अशा गंभीर प्रकारांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे यामुळे समाजात असंतोष पसरत आहे यामुळे उद्रेक होऊ शकतो याची शासनाने दखल घ्यावी आणि हर्षवर्धन बारवरकर याच्यावर अनुसूचित जाती -जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी तसेच सचिनभाऊ खरात यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे
यावेळी प्रदेश सचिव व पुणे जिल्हाध्यक्ष अक्षय चोपडे, प्रदेश मुख्य संघटक फिरोज मुल्ला (सर )प्रदेश उपाध्यक्ष विनोद गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र व पुणे शहर अध्यक्ष राजाभाऊ कांबळे, पुणे शहर युवक अध्यक्ष राहुल घोडके, पुणे शहर अल्पसंख्यांक अध्यक्ष हकीक शेख,पुणे शहर वाहतूक आघाडी अध्यक्ष बाबाहरी सोनवणे,छत्रपती शिवाजीनगर मतदार संघ अध्यक्ष संदीपभाऊ शेंडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636