पुणे : अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागात 20 झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या
पूणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे शहरात काल (12 जून) रात्री तूफान पावसाच्या सरी बरसल्या असून अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागात 20 झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. पुढे आलेल्या माहितीनुसार, नवले पुलानजीक एक जेष्ठ महिला नाल्यामध्ये वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे.सध्या अग्निशमन दलाकडून शोधकार्य सुरु आहे.
दरम्यान, आज सकाळपासून पुण्यात ढगाळ वातावरण आहे. तर आज देखील शहरात पाऊसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय.
दुसरीकडे, 31 ऑगस्ट पर्यंत पर्यटन स्थळी नागरिकांना बंदी घालण्यात आली असून तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. पुणे जिल्ह्यातील लोणावळा मावळ येथील ऐतिहासिक वास्तू गड किल्ले स्मारके पर्यटन स्थळे धरणे आधी ठिकाणे पर्यटकांना बंदी असणार आहे.
पावसाळ्यामध्ये होणाऱ्या दुर्घटना टाळणे त्याचबरोबर नागरिकांच्या सुरक्षेतेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी हे आदेश दिले आहेत. लोणावळा परिसरातील एकविरा देवी कारला लेणी भांजे लेणी भांजे धबधबा लोहगड किल्ला विसापूर किल्ला तिकोना किल्ला टायगर पॉईंट लायन्स पॉईंट शिवलिंग पॉईंट या परिसरामध्ये पावसाळ्यात पर्यटक गर्दी करतात. नागरिकांच्या सुरक्षेतेच्या दृष्टीने आणि कायदा संस्थेचा प्रश्न निर्माण होणे यासाठी या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटकांना बंदी केलेली आहे 31 ऑगस्ट पर्यंत ही बंदी असणार आहे.

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636