राज्यात पुन्हा जोर धरणार पाऊस, कोणकोणत्या भागांना बसणार तडाखा ?


पुणे न्यूज एक्सप्रेस :

 विशेष प्रतिनिधी सुनील पाटील

 

नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावलेला असतानाच मागील 48 तासांमध्ये राज्याच्या कमाल तापमानाच वाढ होताना दिसली. मुंबई शहर आणि उपनगरांसह कोकणातील काही बागांमध्येही आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यानं उष्मा अधिक जाणवू लागला आहे पुढील 24 तासांमध्ये मात्रस हे चित्र पुन्हा बदलणार असून, राज्यात निसर्ग काहीसा रौद्र रुप धारण करताना दिसेल. ज्यामुळं पुढचे काही दिवस राज्याला वादळी पावसाचा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे.

 

 

विश्रांतीवर असणारा पाऊस पुन्हा एकदा कमबॅक करत असताना पुढचे दोन ते तीन दिवस पाऊस नागरिकांच्या अडचणींमध्ये भर टाकताना दिसेल. वादळी पावसाच्या धर्तीवर राज्याच्या काही भागांना हवामान विभागानं यलो अलर्ट देत नागरिकांसह यंत्रणांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

पाऊस पुन्हा सक्रिय झाला….

पाऊल धीम्या गतीनं का असेना, पण पुन्हा सक्रिय झाला असून, सध्या काही त्याचं प्रमाण वाढताना दिसत आहे. ज्यामुळं राज्यातील 26 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून राज्यात या आठवड्याचा शेवट वादळी पावसानं होणार असल्याची माहिती हिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी माध्यमांना दिली आहे.

Advertisement

कोणकोणत्या भागांना बसणार पावसाचा तडाखा ?

वादळी पावसाचा मारा प्रामुख्यानं कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरीमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाची हजेरी असेल. तर, पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, पुण्यासह सोलापूरात आणि राजच्याच्या घाट क्षेत्रामध्ये पावसाची जोरदार हजेरी असेल. तिथं मराठवाडा आणि विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात नाशिक पट्ट्यालासुद्धाय वादळी पावसाचा मारा सोसावा लागणार आहे. गोंदिया, भंडारा, नंदुरबार, लातूर भागात मात्र हवामान कोरडं राहणार असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.

पुढील काही दिवसांसाठी कसं असेल पर्जन्यमान ?

सक्रिय होणारा मान्सून आणि वाऱ्याची बदलणारी दिशा यामुळं 7 ते 10 जूनदरम्यान राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाची हजेरी असेल. ज्यानंतर थेट 13 ते 18 जूनदरम्यान राज्याला मुसळधार पावसाचा तडाखा बसेल. काही जिल्ह्यांना अतिवृअषटीचा मारा सहन करावा लागेलस तर काही ठिकाणी नदीनाले दुथडी भरून वाहू लागलील असाही प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.


pune news express

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page