स्व. आ. डॉ. सा. रे. पाटील स्मृती अ. भा. मराठी कथा स्पर्धेसाठी कथा पाठविण्याचे आवाहन
पुणे न्यूज एक्सप्रेस :
शिरोळ/प्रतिनिधी:
साहित्य सहयोग दीपावली व मासिक इंद्रधनुष्य यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. आ. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील स्मृती अखिल भारतीय मराठी कथा स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. कथा स्पर्धेचे हे १० वे वर्ष असून प्रामुख्याने नवोदित कथाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात येते, अशी माहिती मासिक इंद्रधनुष्यचे कार्यकारी संपादक संजय सुतार व साहित्य सहयोगचे संपादक सुनील इनामदार यांनी एका पत्रकाव्दारे दिली आहे.
स्पर्धेचे पहिले बक्षीस रु.३०००/- मानपत्र व स्मृतीचिन्ह असून दुसरे बक्षीस रु.२०००/- मानपत्र व स्मृतीचिन्ह व तिसरे बक्षीस रु.१०००/- मानपत्र व स्मृतीचिन्ह असे आहे. तसेच विशेष उल्लेखनीय कथा-३ बक्षिसे रु.५००/- मानपत्र व स्मृतीचिन्ह, उत्तेजनार्थ ३ बक्षिसे रु. ५०० मानपत्र व स्मृतीचिन्ह व उत्तेजनार्थ स्थनिक- ३ बक्षिसे रु. ५००/- मानपत्र व स्मृतीचिन्ह अशी एकूण १२ बक्षिसे देण्यात येणार आहेत.
लेखकांनी आपल्या कथा पोष्टाने – सुनील इनामदार, साहित्य सहयोग दीपावली, ५४७५, समता नगर मु.पो. शिरोळ ता. शिरोळ जि. कोल्हापूर पिन.: ४१६ १०३ मोबा: क्रमांक ९८५०२४७७६७ किंवा ई मेल (श्री लिपी किंवा युनिकोड) sahityasahayog@gmail.com वर १५ ऑगस्ट २०२५ पूर्वी पाठवाव्यात.
कथे साठी विषयांचे बंधन नाही पण अश्लिल किंवा वादग्रस्त कथा स्विकारल्या जाणार नाहीत. परिक्षकांचा निकाल अंतिम राहील. विजेत्यांना निकाल कळविण्यात येईल व वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात येईल. विजेत्या व अन्य निवडक कथा साहित्य सहयोग दिवाळी अंकात प्रकाशित होतील, अशी माहिती संजय सुतार व सुनील इनामदार यांनी दिली आहे.
संजय सुतार – कार्यकारी संपादक इंद्रधनुष्य
सुनील इनामदार – संपादक साहित्य सहयोग

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636