“जीवन गौरव” पुरस्काराने सुरेश प्रभुणे सन्मानित
“व्यावसायिकांसाठी त्यांनी केलेले कार्य दीपस्तंभारखे सचिन जोशी अध्यक्ष स्टेशनरी,कटलरी अँड जनरल मर्चंट्स असोसिएशन
पुणे. : (प्रतिनिधी)
पुण्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक सुरेश प्रभुणे यांना या वर्षीचा स्टेशनरी,कटलरी अँड जनरल मर्चंट्स असोसिएशन द्वारा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सन्मानपत्र,सन्मानचिन्ह, शाल,पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप असून पुण्यातील शुक्रवार पेठेतील नातूबाग गणपती चौक येथील “वरदश्री” सभागृहात आठ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता संस्थेच्या सभासदांसाठी झालेल्या वार्षिक सभेमध्ये सुरेश प्रभुणे यांना सपत्निक सन्मानित करण्यात आले.संस्थेचे अध्यक्ष सचिन जोशी यांनी सुरेश प्रभुणे व सौ स्नेहल प्रभुणे यांचा सन्मानचिन्ह,शाल,सन्मानपत्र,पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.व त्यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा केली.संजय जोशी पुढे म्हणाले,
“पुण्यातील नॅशनल केमिकल्स लॅबोरेटरी मधून २९ वर्षे सेवा केल्यानंतर प्रभुणे सेवानिवृत्त झाले असले तरी त्यांचे संघ कार्य चालू आहे.माणसे जोडणारे,सतत कार्यरत,स्पष्ट बोलणारे,असे सुरेश प्रभुणे यांचे व्यक्तिमत्व.अहिल्यादेवी शाळेजवळ छोटेसे दुकाना द्वारे त्यांनी व्यवसाय सुरू केला.मुलांना शिकवले.निवृत्त झाल्यावर अखेरचे वेतन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यास अर्पण केले.
पुण्यातील स्टेशनरी,कटलरी,अँड जनरल मर्चंट्स असोसिएशन च्या कार्यास सुरवातीपासून ते आज पर्यंत सर्व व्यापारी बांधवांना,समाजातील सर्व घटकातील नागरिकांना ते मदत करत असतात.त्यांनी २०१३ व २०१४ ह्या वर्षी संस्थेचे अध्यक्षपद ही भूषविले.गेले ४०- ४५ वर्ष ह्या संस्थेबरोबर कार्यरत असून त्यांच्या अध्यक्षकाळामध्ये सभासदांना गुढी पाडवा निमित्ताने शुभेच्छा पत्र तसेच मकरसंक्रांती निमित्त सभासदांना प्रत्यक्ष तिळगुळ देणे,स्नेह मेळावा घेणे,असे उपक्रम लोकप्रिय झाले होते.दिवाळी संपर्क पत्रिका जास्तीत जास्त पानामध्ये काढण्याचा विक्रम करून संस्थेला उत्पन्न मिळवून देणारा उपक्रम अजूनही चालू आहे.”
सत्काराला उत्तर देतांना सुरेश प्रभुणे म्हणाले,” या संस्थेच्या कार्यास मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रेरणा मिळाली.कै रामभाऊ म्हाळगी यांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणेने मी घडलो.त्यांनी सांगितलेल्या ” कार्यकर्त्यांच्या डोक्यावर बर्फ,जिभेवर साखर व पायाला भिंगरी” त्रिसूत्री मंत्राने मी आयुष्यभर कार्य केले.१९६० पासून संघाच्या कामात आहे. पू .गोळवलकर गुरुजी,तात्या बापट,बाबाराव भिडे,जगन्नाथराव जोशी,रामभाऊ म्हाळगी यांचे मार्गदर्शन लाभले.बँक ऑफ महाराष्ट्र मधील वरिष्ठ अधिकारी सदानंद भागवत यांच्या मदतीमुळे व्यवसाय यशस्वी करू शकलो.तळजाई शिबिर,हिंजवडी शिबिर,मोतीबाग प्रकल्प अशा अनेक संघाच्या सेवा कार्यात मला प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.”
— – – – – – – – – – – – – – – –
अधिक माहितीसाठी
सचिन जोशी
मोबाईल 9422558833
………………………………….
फोटो ओळ
स्टेशनरी,कटलरी अँड जनरल मर्चंट्स असोसिएशन द्वारा “जीवन गौरव पुरस्कार”सचिन जोशी यांचे हस्ते सुरेश प्रभुणे यांना प्रदान करतांना.नितीन पंडित,मोहन कुडचे, संजय राठी,सीए अविनाश मुजुमदार,स्नेहल सुरेश प्रभुणे

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636