अरुण विद्या मंदिर इचलकरंजी येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न
पुणे न्यूज एक्सप्रेस :
इचलकरंजी येथील अरुण विद्या मंदिर इचलकरंजी या प्राथमिक शाळेत शाळा प्रवेशोत्सव 2025 -26 अंतर्गत इयत्ता पहिलीच्या वर्गात 60 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. संस्थेचे अध्यक्ष श्री अशोकराव स्वामी यांनी सर्व पालकांचे स्वागत करून नवीन प्रवेश घेतलेल्य इयत्ता पहिलीच्या सर्व मुलांना वह्या ,पुस्तके, शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले मुलांचे मनोरंजन करण्यासाठी रियल स्टार श्री बसवराज टकळगी हे मोटू पतलू ची वेशभूषा करून उपस्थित होते त्यांनी मुलांचे भरपूर असे मनोरंजन केले यावेळी उपस्थित नगरपालिकेचे अधिकारी योगेश कोंडेकर, सेक्रेटरी श्री संग्राम स्वामी ,श्री सुनील तोडकर, श्री चंद्रकांत बडवे, यांनी सर्व मुलांचे औक्षण केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय कोळी सर ,यांनी शाळेबाबतची माहिती सांगितली तर श्री आसिफ वाटे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले .व प्रशांत गुरव सर यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी सर्व शिक्षकांसह इयत्ता पहिली ते चौथी विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636