कोल्हापूर पोलीस दल व इचलकरंजी पोलीस उप विभाग गणराय अवॉर्ड वितरण सोहळा दिमाखात संपन्न.
समाजातील सकारात्मक बदलासाठी तरुणाईने पुढाकार घ्यावा – अधीक्षक योगेशकुमार गुप्ता
गजानन शिरगावे :
इचलकरंजी : कोल्हापूर पोलीस दल व इचलकरंजी पोलीस उप विभागामार्फत शहरातील प्रतिष्ठेचा समाजाला जाणारा गणराय अवॉर्ड वितरण सोहळा घोरपडे नाट्यगृह येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या सोहळ्यासाठी सामाजिक संघटना,सेवाभावी संस्थाचे पदाधिकारी,विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली.
डॉल्बीमुक्त व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून समाजप्रबोधनाचे देखावे व समाजहिताचे कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता साहेब यांचे हस्ते गणराय अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले.पुरस्कार विजेत्यांनी आपल्या कार्याची माहिती देत समाजासाठी अधिक जबाबदारीने काम करण्याची ग्वाही दिली.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता साहेबांनी समाजातील सकारात्मक बदलासाठी तरुणाईने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. तसेच “गणेशोत्सव केवळ धार्मिक पर्व नसून समाजजागृतीचे व्यासपीठ आहे” असे मत व्यक्त केले.
सोहळ्यात सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत आणली. उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात विजेत्यांचा सत्कार करत कार्यक्रमाचे कौतुक केले.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, प्रभारी अधिकारी शरद वायदंडे, महेश चव्हाण, सचिन सूर्यवंशी, रविराज फडणवीस, एन आर चौखंडे, सर्व पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस अधिकारी, सामाजिक संघटना, सेवाभावी संस्थाचे पदाधिकारी, पत्रकार बंधू, सामाजिक कार्यकर्ते, गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष,कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636