प्रा. प्रमोदिनी माने मॅडम यांना अहिल्यादेवी महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराने कराड येथे सन्मानित करण्यात आले.
पुणे न्यूज एक्सप्रेस :
प्रतिनिधी- वारणा-
कोडोली आज दिनांक 17 जून 2025 रोजी कराड येथे झालेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्री शताब्दी निमित्त कोडोली तालुका पन्हाळा येथील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणाऱ्या प्राध्यापिका प्रमोदिनी माने मॅडम यांना अहिल्यादेवी महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराने कराड येथे सन्मानित करण्यात आले.
Advertisement
यावेळी माने मॅडम यांना शैक्षणिक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमासाठी कराड येथे सामाजिक कार्यकर्त्या सौ.अनिता पाटील मॅडम तसेच सौ.भारती जाधव, सौ.रूपाली आटोळकर, सौ.सुप्रिया मुळीक, श्रीमती माधवी लाड, सौ.संगीता नरके, सौ.रेवती पाटील, सौ.अनुजा काय इंगळे, सौ.सुमन पाटील, सौ.सुनीता माने, सौ.निलम पाटील या सर्व कार्यकर्त्या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.
या कार्यक्रमासाठी समर्थ सक्सेस चे ब्लू डायमंड श्री गजानन कुंभार सर व डॉ.भास्कर समुद्रे यांनी उपस्थित महिलांना आरोग्य विषयी माहिती दिली.यावेळी मिलिंद समुद्रे सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ.अनिता पाटील मॅडम यांनी केले.या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी डॉ.भास्कर सामुद्रे महाराष्ट्र राज्य मुख्य प्रभारी न्यूज स्टार फाईव्ह मराठी मीडिया

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636