तारदाळ, खोतवाडी येथे शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..
तारदाळ ता. हातकलंगले येथील जय शिवराय तरुण मंडळ, शिवराज्याभिषेक सोहळा उत्सव कमिटी. यांच्यावतीने ३५२ वा. शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्य संस्थापक. छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा शुक्रवार दिनांक ६ जून रोजी सकाळी शिवभक्तांच्या उपस्थितीत दिमाखात व भव्य स्वरूपात तारदाळ येथील वठारे गल्ली माळभाग येथे करण्यात आला. दीपक पवार व चंद्रकांत कारंडे यांच्या शुभहस्ते छत्रपतींवर शास्त्रशुद्ध व विधिवत पद्धतीने दुग्धाअभिषेक करून राज्याभिषेक संपन्न झाला.
यावेळी गावातील विविथ क्षेत्रातील मान्यवरांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करीत शिवरायांना अभिवादन केलं. तसेच सायंकाळच्या सत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान कार्याला वंदन करण्यासाठी. शिवभक्तांनी मोठ्या उत्साहाने शिवराज्याभिषेक दिन सोहळा मिरवणुकीचा आयोजन केले होते. तसेच ग्रामपंचायत प्रांगणात शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त तारदाळ मधील पत्रकार बांधवांच्या शुभहस्ते ध्वज पूजन ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मा.नियोजन मंडळाचे सदस्य प्रसाद खोबरे, लोकनियुक्त सरपंच पल्लवी पवार, मा. उपसरपंच प्रवीण पाटील, चंद्रकांत तांबवे, ग्रामपंचायत सदस्य नितीन खोचरे, विजय चौगुले ,जीवन माने, पिंटू दाते, ग्रामपंचायत कर्मचारी भाऊसो चौगुले, अजित वाडीकर, विनायक कोळी, विनायक वडर,भारत निर्माण पाणीपुरवठा महिला कर्मचारी यांच्यासह मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
त्याच बरोबर मौजे खोतवाडी ग्रामपंचायत मध्ये शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. लोकनियुक्त सरपंच श्री. विशाल कुंभार, यांच्या हस्ते ध्वज पूजन ध्वजारोहण करण्यात आले.ग्रामपंचायत सदस्य श्री. उत्तम सासणे, श्री. करण खोत, रोहन माने तंटामुक्त अध्यक्ष प्रमोद माने, ग्रामस्थ व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636